बदलापूर अत्याचार! आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाला नवं वळण…

मुंबई : बदलापूरच्या एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केला. या प्रकरणाचे वेगवेगळे पडसाद उमटत आहे. मृत आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अक्षयच्या एकनकाउंटरची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

पोलिस या प्रकरणातील पुरावे नष्ट करतील असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तातडीने या प्रकरणावर सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. उच्च न्यायालयाने हे प्रकरण आज सुनावणीसाठी ठेवले आहे.

अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करणारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षय शिंदे याला कारागृहातून नेल्यापासून ते एन्काउंटरपर्यंत काय घडलं हे सांगितले. ते म्हणाले की, ‘सोमवारी साधारण संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास तळोजा मध्यवर्ती कारागृहातून आरोपी अक्षय शिंदे याचा कायदेशीर ताबा घेतला. आम्ही अक्षयला घेऊन ठाणे येथील कार्यालयात घेऊन जात होतो. तेव्हा माझ्यासोबत सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे, पोलिस हवालदार अभिजीत मोरे, पोलिस हवालदार हरीश तावडे हे तिघे होते. अक्षय शिंदे याला आम्ही ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला घेऊन जाणारी व्हॅन असल्यामुळे मागे एपीआय निलेश मोरे, हवालदार अभिजीत मोरे आणि हरीश तावडे हे तिघे अक्षय शिंदे या आरोपी सोबत बसले होते आणि मी पुढे ड्रायव्हरच्या सीट येथे बसलो होतो. अचानक शीळ डाऊघर येथे पोलिस व्हॅन आली असता मला सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की, ‘अक्षय शिंदे हा जोरात ओरडत आहे. यामुळे मी गाडी थांबवली आणि मागे गाडीत जाऊन बसलो. माझ्या समोरच्या सीटवर सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे, त्यांच्या बाजूला आरोपी अक्षय शिंदे आणि त्यानंतर पोलिस हवालदार अभिजीत मोरे असे तिघे बसले होते. मी अक्षय शिंदेला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो शिवीगाळ करत होता.’

पोलिस व्हॅन मुंबई येथील व्हाय जंक्शन ब्रिजवर आली असताना संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास अक्षय शिंदे याने अचानक सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेला असलेले सरकारी पिस्तूल बळाचा वापर करत हिसकावण्याचा प्रयत्न केला. “मला जाऊ द्या,” असे तो म्हणत होता. या झटापटीत निलेश मोरे यांचे पिस्तूल लोड झाले व त्यातील एक राऊंड हा निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीत घुसल्याने निलेश मोरे खाली पडले.

अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांचे पिस्टल घेऊन “आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही,” असे रागाने ओरडून बोलू लागला होता. अक्षयने अचानक हवालदार हरीश तावडे यांच्या दिशेने पिस्टल रोखून त्यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने दोन गोळ्या झाडल्या. परंतु आमच्या नशिबाने त्या गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत. आरोपी अक्षय शिंदे यांचे रौद्ररूप व देहबोली पाहून तो त्याच्याकडे असलेल्या पिस्टलमधून गोळ्या झाडून जीवे मारणार अशी आमची पूर्णपणे खात्री झाली. मी प्रसंगावधान राखून व माझे सहकारी यांचे संरक्षणाकरता माझ्याकडील पिस्टलने एक गोळी अक्षयच्या दिशेने झाडली, असे पोलिस अधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.

अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झालेल्या पोलिसांच्या गाडीत काय सापडलं पाहा…

अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करणारे स्पेशालिस्ट संजय शिंदे आहेत कोण?

अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची A टू Z स्टोरी…

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर झाडली गोळी!

बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याची दुसरी पत्नीही आली समोर: म्हणाली लिंगपिसाट…

बदलापूर प्रकरण! आरोपी अक्षय शिंदे याची चिमुकल्यांसमोर ओळख परेड…

बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीकडून धक्कादायक खुलासे…

बदलापूर प्रकरणात नवं ट्विस्ट; आरोपीचे आई-वडिल म्हणाले…

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…

धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली…

Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…

बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…

बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा…

संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…

धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…

बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!