लहान मुलांना चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…
मुंबई: फुटपाथवर राहणाऱ्या वाघरी कुटूंबातील लहान मुलांना चोरून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. मुंबईच्या मालवणी, गोवंडी आणि नाशिक परिसरातून या सहा आरोपींच्या टोळीला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुले नसणाऱ्या नागरिकांना लहान मुले विकण्याचे काम या टोळीकडून सुरू होते. एक-दीड वर्षाच्या मुलासाठी खरेदीदाराकडून दीड ते दोन लाख रुपये या मुले चोरणाऱ्या टोळीला मिळतात, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. इरफान फुरखान खान (वय 26), सलाहुद्दीत नुरमोहम्मद सय्यद (वय 23), आदिल शेख खान (वय 19), तौफिर इक्बाल सय्यद (वय 26), रझा अस्लम शेख (वय 25), समाधान जगताप अशी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत.
दरम्यान, लहान मुलांना चोरून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. या टोळीने आतापर्यंत किती मुलांची चोरी केली आणि कोणाल ती विकली याबाबतची माहिती तपासादरम्यान समोर येईल.
मुंबई पोलिसांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल अन् पैसे…
मुंबईत एअर होस्टेस गळा चिरून हत्या; एकाला अटक…
संतापजनक! चिमुकलीची हत्या करून मृतदेह कोंबला प्लॅस्टिकच्या बादलीत…
मुंबईमधून शिक्षिका मारिया खान बेपत्ता; काही अघटित तर नाही ना…
Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…