बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याची दुसरी पत्नीही आली समोर: म्हणाली लिंगपिसाट…

ठाणेः बदलापूर येथील एका शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे कारागृहात असून, त्याच्या पहिल्या पत्नीनंतर दुसरी पत्नी समोर आली आहे. तिने देखील अक्षयच्या संदर्भात धक्कादायक आरोप केले आहेत.

आरोपी अक्षय शिंदे याने तीन लग्न केली होती. पहिल्या दोन्ही पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेल्या होत्या. तर त्याच्यासोबत राहणारी तिसरी पत्नी ही गर्भवती आहे. बदलापूर प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने आरोपीच्या पहिल्या पत्नीचा जबाब नोंदवला होता. ती पालघर जिल्ह्यातील एका गावात राहत असल्याची माहिती आहे. आरोपी अक्षय याचे पहिले लग्न झाल्यानंतर त्याची पहिली पत्नी लग्नाच्या अवघ्या पाच दिवसात माहेरी निघून गेली होती. अक्षय शारिरीक संबंधावेळी हिंसकपणे वागायचा. त्याची वृत्ती एखादा हैवान किंवा लिंगपिसाटासारखी होती. त्यामुळे लग्नाच्या अवघ्या पाच दिवसात ती माहेरी निघून गेली आणि पुन्हा परतली नाही.

पोलिसांनी अक्षय शिंदे याच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. बोईसर पोलिसांनी त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. नंतर हे प्रकरण बदलापूर (पूर्व) पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. आरोपी अक्षय शिंदे याने दुसऱ्या पत्नीला अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिने तिच्या कुटुंबीयांना आरोपीच्या वागणुकीची माहिती दिली आणि नंतर त्याला सोडून दिले. या प्रकरणी बोईसर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अक्षयच्या या पहिल्या दोन्ही पत्नींच्या जबाबामुळे बदलापूर प्रकरणात पोलिसांना चौकशीच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळू शकतो.

बदलापूर प्रकरण! आरोपी अक्षय शिंदे याची चिमुकल्यांसमोर ओळख परेड…

बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीकडून धक्कादायक खुलासे…

बदलापूर प्रकरणात नवं ट्विस्ट; आरोपीचे आई-वडिल म्हणाले…

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…

धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली…

Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…

बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…

बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा…

संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…

धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…

बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!