‘पोलिसकाका’च्या बातमीचा परिणाम! पुणे पोलीस आयुक्तालयात दिवाळी गिफ्ट आणण्यास बंदी…

पुणे (संतोष धायबर) : पुणे पोलीस आयुक्तालयात सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असताना दिवाळीच्या शुभेच्छांच्या नावाखाली गिफ्ट घेऊन येणाऱ्या अभ्यागतांचे मात्र स्वागत होत असल्याचा गंभीर प्रकार ‘पोलिसकाका’ने उघडकीस आणला होता. या बातमीची दखल घेत पुणे पोलीस आयुक्तालयाने आता दिवाळीच्या निमित्ताने गिफ्ट स्वीकारण्यासंदर्भात स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत.

पोलिसकाकाचे संपादक संतोष धायबर यांनी पुणे पोलिस आयुक्तालयात गिफ्टधारकांना पायघड्या, सर्वसामान्य नागरिकांना कात्रजचा घाट! या शीर्षकाखाली बातमी केली होती.  पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘पोलिसकाका’च्या बातमीची तत्काळ दखल घेत कार्यवाही केली आहे. पोलिस आयुक्तांच्या स्वाक्षरीने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रात दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणत्याही अभ्यागताने गिफ्ट घेऊन पोलीस आयुक्तालयात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्तालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर कर्तव्यावर असलेल्या अंमलदारांना याबाबत सक्त सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावर येणाऱ्या अभ्यागतांकडील साहित्याची तपासणी करूनच त्यांना आत प्रवेश द्यावा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, प्रवेशद्वारावर यासंदर्भातील सूचना फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसकाकाने मांडला होता सर्वसामान्यांचा प्रश्न!
पुणे पोलीस आयुक्तालयात न्याय मागण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. मात्र, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने गिफ्ट घेऊन येणाऱ्या काही अभ्यागतांना विशेष वागणूक मिळत असल्याचे चित्र समोर आले होते. या दुजाभावावर पोलिसकाकाने बातमीच्या माध्यमातून बोट ठेवले होते.

दरम्यान, पोलिसकाकाने उपस्थित केलेला प्रश्न केवळ गिफ्ट स्वीकारण्यापुरता मर्यादित नाही. तो पोलीस प्रशासनातील समान वागणूक, पारदर्शकता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सन्मानाचाही आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयात गिफ्टधारकांना पायघड्या, सर्वसामान्य नागरिकांना कात्रजचा घाट!

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बंगल्यात पोलिस कर्मचाऱ्याकडून कार घुसवण्याचा प्रयत्न अन्…

पुणे पोलिस दलातील पोलिसाचा कारनामा अन् सेवेतून बडतर्फ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!