अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे दहन नाही तर दफन केले जाणार; कारण…

ठाणे : बदलापूरच्या शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेचा मृतदेह दहन न करता दफन करण्याची इच्छा त्याच्या कुटुंबाने व्यक्त केली आहे. अक्षय शिंदे याच्या वडिलांचे वकील अमित कटारनवरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह पुरला जाणार आहे, असे अमित कटारनवरे यांनी सांगितले.

भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. परंतु, मृतदेह पुरण्यासाठीही जागा मिळत नाही. अक्षय शिंदे याला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यामुळे कुटुंबाची भावना आहे की अक्षयचा मृतदेह शक्य तितका जतन करून ठेवला जावा, अशी प्रतिक्रिया अमित कटारनवरे यांनी दिली.

अक्षय शिंदे याच्या दफनविधीसाठी पोलिसांनी जागा उपलब्ध करून द्यावी आणि यासंदर्भात महानगरपालिकेशी बोलावे असे सांगितलं आहे. उच्च न्यायालयात आज (बुधवार) सरकारी वकिलांकडून महानगरपालिकेशी बोलून दफनविधीसाठी जागा दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे अक्षय शिंदे याच्या वडिलांचे वकील अमित कटारनवरे म्हणाले आहेत.

दरम्यान, तळोजा कारागृहातून सोमवारी (ता. २४) रिमांडसाठी नेत असताना पोलिसांच्या जीपमध्ये असताना अक्षयने पोलिसांकडे असलेली सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचून घेतली आणि पोलिसांवरच तीन गोळ्या झाडल्या. यातली एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली. यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलीस निरिक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळी झाडली, यामध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे.

अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी न्यायमुर्तींनी विचारले पोलिसांना अनेक प्रश्न…

बदलापूर प्रकरण! वकिलाचा दावा अन् संशयास्पद पोलिस चकमकीवर प्रश्न…

बदलापूर अत्याचार! आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाला नवं वळण…

अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झालेल्या पोलिसांच्या गाडीत काय सापडलं पाहा…

अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करणारे स्पेशालिस्ट संजय शिंदे आहेत कोण?

अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची A टू Z स्टोरी…

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर झाडली गोळी!

बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याची दुसरी पत्नीही आली समोर: म्हणाली लिंगपिसाट…

बदलापूर प्रकरण! आरोपी अक्षय शिंदे याची चिमुकल्यांसमोर ओळख परेड…

बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीकडून धक्कादायक खुलासे…

बदलापूर प्रकरणात नवं ट्विस्ट; आरोपीचे आई-वडिल म्हणाले…

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…

धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली…

Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…

बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…

बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा…

संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…

धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…

बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!