
अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झालेल्या पोलिसांच्या गाडीत काय सापडलं पाहा…
मुंबईः बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता. २३) संध्याकाळी मुंब्रा परिसरात एन्काऊंटर झाला आहे. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलिस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. सदर खळबळजनक घटनेनंतर सदर प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु करण्यात आली आहे.
सदर प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास वरीष्ठ डीसीपी पराग मनेरे यांच्याकडे देण्यात आला आहे. ज्या पोलिसांच्या गाडीत अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला त्याची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. ठाणे पोलिस मुख्यालयाच्या शेजारी पोलिसांच्या परेडग्राऊडमध्ये ठेवण्यात आली आहे. यावेळी फॉरेन्सिक टीमला या पोलिस वाहनातून चार बुलेट शेल सापडले आहेत. अक्षय शिंदे याने एकुण तीन गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक गोळी एपीआय नीलेश मोरे यांच्या पायाला लागली, तर दोन गोळी मिस फायर झाल्या होत्या. तर एक गोळी पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी झाडली असून त्यात अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत होते. अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात मोरे गंभीर जखमी झाले. अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून अक्षय शिंदे याच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या. त्यात तो गंभीर जखमी झाला. कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांचा ‘त्या’ कागदाबाबत गंभीर आरोप…
अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करणारे स्पेशालिस्ट संजय शिंदे आहेत कोण?
अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची A टू Z स्टोरी…
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर झाडली गोळी!
बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याची दुसरी पत्नीही आली समोर: म्हणाली लिंगपिसाट…
बदलापूर प्रकरण! आरोपी अक्षय शिंदे याची चिमुकल्यांसमोर ओळख परेड…
बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीकडून धक्कादायक खुलासे…
बदलापूर प्रकरणात नवं ट्विस्ट; आरोपीचे आई-वडिल म्हणाले…
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…
धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली…
Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…
बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…
बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…
बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा…
संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…
धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…
बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

