पत्नीसोबत नको त्या अवस्थेत युवकाला पाहिलं अन् नवऱ्याने घेतला क्रूरपणे बदला…

नवी दिल्ली : पत्नीसोबत नको त्या अवस्थेत सापडलेल्या पकडल्यानंतर नवऱ्याने युवकाला बेदम मारहाण केली. त्याच्या हाताची नखे उखडलेली आणि क्रूरपणे मारहाण करत खून केल्याची घटना शास्त्री पार्क परिसरात सोमवारी (ता. १६) घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

रितिक वर्मा (वय २१) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. रितिक वर्मा हा आरोपीच्या पत्नीसोबत नको त्या अवस्थेत सापडला होता. सोमवारी सकाळी ११ वाजता महिलेच्या पतीने त्याला घरात पकडले आणि बंधक बनवले. आरोपीच्या पत्नीचे आणि रितिकचे प्रेमसंबंध सुरू होते. नवऱ्याला ही गोष्ट कळाली तेव्हा त्याने दोघांना एकत्र पकडले. त्यानंतर पत्नी आणि रितिक दोघांनाही बेदम मारहाण केली. जवळपास १ तास युवकाला मारले. त्याच्या बोटाची नखे उखडली. शरीराच्या प्रत्येक भागावर मारहाणीच्या खूणा आढळल्या आहेत, असे मृत युवकाच्या काकाने सांगितले.

रितिक वर्मा त्याच्या कुटुंबासह शास्त्री पार्क येथे भाड्याने राहायचा. रितिक त्याच्या वडिलांसह ट्रक चालवायचा. रितिकची एक मैत्रिण शास्त्री पार्कमध्ये राहायची. सोमवारी सकाळी ९ वाजता रितिकला फोन आला होता. यानंतर तो घरातून थोड्याच वेळात येतो असे सांगून घरातून बाहेर पडला. ११ च्या सुमारास कुणीतरी रितिकच्या वडिलांना फोन करून तुमच्या मुलाला अजमत आणि त्याचे सहकारी घरात बंधक बनवून निर्दयी मारहाण करत आहेत असे सांगितल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

रितिकचे नातेवाईक घटनास्थळी पोहचले तेव्हा तिथे घराचा दरवाजा आतून बंद होता. आतमधून मुलाच्या ओरडण्याचा आवाज येत होता. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु तो उघडला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत घरचा दरवाजा उघडला. पोलीस आणि नातेवाईक आतमध्ये गेले तेव्हा रितिक जमिनीवर पडला होता, त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. बोटातून रक्त वाहत होते. दोन्ही हाताची नखे उखडली होती. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. त्यासोबत महिला आणि रितिकला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे रात्री ९ वाजता रितिकचा मृत्यू झाला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस कॉन्स्टेबल नको त्या अवस्थेत पकडले; पुरावे दाखवताच तत्काळ निलंबित…

धक्कादायक! मुलीला आणि प्रियकराला पहाटेच्या सुमारास नको त्या अवस्थेत पाहिले अन्…

पत्नी आणि प्रियकराचा नको त्या अवस्थेतच पतीने केला खून…

घराचा दरवाजा उघडताच पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले अन् फिरलं डोकं…

डॉक्टर पत्नीला दोन युवकांसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!