Video: आईस्क्रीममध्ये बोटानंतर सापडली गोम…

नवी दिल्ली : मुंबईमध्ये एक महिला आईस्क्रीम खात असताना माणसाचं बोट सापडली होती. दुसऱ्या घटनेत आईस्क्रीममध्ये गोम सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अमूल कंपनीच्या आईस्क्रीमच्या डब्यामध्ये गोम सापडल्याचा दावा एका महिलेने केला असून, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईतील मालाडमध्ये आईस्क्रीमच्या कोनमध्ये माणसाचं बोट सापडल्यानंतर आता नोएडामध्ये आइस्क्रीमच्या डब्यात गोम सापडल्याची घटना समोर आली आहे. सेक्टर-12 मध्ये राहणाऱ्या दीपाने शनिवारी सकाळी ऑनलाइन डिलिव्हरी ॲप ब्लिंकिटवरून अमूलचे आईस्क्रीम ऑनलाइन ऑर्डर केला होता. या महिलेने दावा केला आहे की, तिने अमूल आईस्क्रीमचा डबा उघडला तेव्हा त्यात एक गोम होती. या घटनेमुळे महिलेसह संपूर्ण कुटुंबियांना धक्का बसल्याचेही महिलेने सांगितले आहे.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

दरम्यान, अमूल ही भारतातील सर्वात मोठी डेअरी कंपन्यांपैकी एक आहे. दूध, दही, चीज, लोणी आणि आईस्क्रीम यांसारख्या उत्पादनांसाठी अमूल एक विश्वासार्ह ब्रँड आहे. पण नोएडातील या घटनेने लोकांच्या मनात गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. या व्हिडीओची पुष्टी आम्ही करत नाही. अमूल कंपनीने अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

मुंबईत आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाचे पुणे कनेक्शन; कंपनी म्हणाली…

मुंबईत महिलेला आईस्क्रीम खाताना कोनमध्ये सापडलं माणसाचं बोट…

संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…

नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला गेटला बांधले अन्…

हृदयद्रावक! एक तासापूर्वी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून मृत्यू…

डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेने संपत्तीसाठी काढला सासऱ्याचा काटा…

मुंबई विमानतळावर महिलांची सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारी चक्रावले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!