
पुणे शहरात संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल पंप राहणार बंद, कारण…
पुणे: पुणे शहरातील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर गेल्या काही दिवसातून हल्ले होत असल्याचे प्रकार घडत आहेत. याच्या निषेधार्थ आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे आता पुण्यात खळबळ उडाली आहे.
पुणे शहरातील भैरोबानाला, पुलगेट आणि येरवडा येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल पंप संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच चालू राहणार असल्याचं जाहीर केले आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर पुण्यात गेल्या काही दिवसातून हल्ले होते आहेत. याच्या निषेधार्थ आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय घेतला गेल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यात सात दिवसात कर्मचाऱ्यावर तीन हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशन यांनी पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना विनंती करून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. संरक्षण मिळालं तरच पेट्रोल पंप चालू ठेऊ अन्यथा पेट्रोल पंपावर एकही थेंब पेट्रोल मिळणार नाही, असे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सांगितले आहे.
पुणे शहरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराने संपवलं आयुष्य…
पुणे शहरात चिमुकल्याला सावत्र आई-वडिलांकडून बेदम मारहाण; गुन्हा दाखल…
पुणे शहरात दिवसाढवळ्या कॉलेज परिसरात युवकाची हत्या…
पुणे! शिवाजीनगर पोलिसांनी सराईत गुन्हेगारास सापळा रचून केले जेरबंद…
पुणे! दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा वारजे माळवाडी पोलिसांकडून उलगडा…

