मुंबई विमानतळावर महिलांची सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारी चक्रावले…

मुंबई : मुंबई विमानतळावर परदेशातून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन परदेशी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या सोन्याची किंमत तब्बल 19 कोटी 15 लाख एवढी आहे, अशी माहिती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या महिलांची सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारीही चक्रावून गेले आहेत.

मुंबई विमानतळ सीमा विभागाने 19.15 कोटी रुपयांचे 32.79 किलो सोने जप्त केले आहे. केनियन देशातील या दोन महिला प्रवाशांच्या आतील पोशाखात आणि साहित्यामध्ये हे सोने लपवून भारतात आणले होते. नैरोबीमधील एका फ्लायरला रोखण्यात आले आणि तिच्या अंडरगारमेंट्स आणि बॅगेजमध्ये 6.60 कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे 28 तुकडे सापडले. दुसऱ्या प्रकरणात नैरोबीच्या दुसऱ्या फ्लायरकडे तिच्या अंतर्वस्त्रांमध्ये आणि साहित्यात 12.54 कोटी रुपये किमतीच्या सोन्याच्या बारचे 70 तुकडे आढळून आले आहेत.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसांनी दोन्ही महिला प्रवाशांना अटक केली असून, त्यांना सोन्याचा पुरवठा कोणी केला आणि हे सोनं मुंबईला कोणाला देणार होते याचा तपास सध्या कस्टम विभागाचे अधिकारी करत आहेत.

विमानतळावर तपासणी करतानाच परदेशी महिलेच्या अंडरगारमेंटमध्ये…

नागपूरच्या विमानतळावरून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्सचा साठा जप्त…

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण! विशाल अगरवाल याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल…

प्रसिद्ध अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!