
मुलीच्या नावे चॅटिंग! पुणे शहरात रस्त्यात भर दिवसा पाठलाग करून कोयत्याने हल्ला…
पुणे : पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर भर दिवसा एका युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सागर चव्हाण असे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुणे शहरातील डहाणूकर कॉलनी परिसरात मे महिन्यात एकमेकांकडे बघितल्यावरून वाद झाला होता. तेव्हा एका युवकावर कोयत्याने वार करण्यात आला होता. या हल्ल्यात श्रीनिवास वतसलवार या युवकाचा मृत्यू झाला होता. युवकावर हल्ला करणाऱ्यांपैकी सागर चव्हाण हा एक होता. सागर चव्हाण याने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे.
सागर चव्हाण याला एका मित्राने बोलावल्यामुळे तो किरकटवाडी भागात आला होता. भररस्त्यात त्याचा पाठलाग करण्यात आला. कोयता घेऊन हल्लेखोर त्याच्या मागे लागले होते. कोयत्याचा वार लागल्यानंतर तो रस्त्यात पडला. त्यानंतर दोघांनी त्याच्यावर सलग अनेक वार केले. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला असतानाही त्याच्यावर वार केले गेले. जखमी असलेल्या सागरला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार केले जात आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
मुलीच्या नावे महिनाभर चॅटिंग…
आरोपींनी इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने फेक अकाउंट बनवले. त्यानंतर सागर चव्हाण याच्या सोबत मैत्री केली. जवळपास महिनाभर सागरसोबत मुलीच्या नावे चॅटिंग केली. त्यानंतर आज सकाळी सागरला भेटायला बोलावले. जेव्हा सागर निश्चित स्थळी भेटायला आला तेव्हा त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. किरकटवाडी फाटा येथे ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या दरोडाविरोधी पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…
पुणे शहरात खूनसत्र थांबेना; युवकाची मध्यरात्री हत्या…
पुण्यात डंपरने मोटारीला धडक दिल्याने पिता-पुत्राचा मृत्यू…
पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…
पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….

