मुंबईत महिलेला आईस्क्रीम खाताना कोनमध्ये सापडलं माणसाचं बोट…

मुंबई : मुंबईतील मालाड भागात राहात असलेल्या एका महिलेने ऑनलाइन आईस्क्रीम मागवली होती. आईस्क्रीम खात असताना कोनमध्ये माणसाचे कापलेले बोट सापडल्यानंतर महिलेला मोठा धक्का बसला आहे. महिलेनं याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे.

प्राथमिक तपासात पोलिसांचे म्हणणे आहे की, आइस्क्रीम कोनमध्ये मानवी शरीराचा अवयव आढळला आहे. अधिक पुष्टीकरणासाठी पोलिसांनी आइस्क्रीममध्ये सापडलेला मानवी शरीराचा भाग FSL विभागाकडे पाठवला आहे.

महिलेने अर्ध्याहून अधिक आईस्क्रीम खाल्ले होते. मात्र, नंतर काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच तिने तपासणी केली असता त्या आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचे तुकडे असल्याचे दिसले. हे पाहून महिलेला धक्का बसला. महिलेला सुमारे 2 सेमी लांबीचा मानवी बोटाचा तुकडा यात आढळला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…

नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला गेटला बांधले अन्…

हृदयद्रावक! एक तासापूर्वी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून मृत्यू…

डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेने संपत्तीसाठी काढला सासऱ्याचा काटा…

मुंबई विमानतळावर महिलांची सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारी चक्रावले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!