क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेने संपत्तीसाठी काढला सासऱ्याचा काटा…

नागपूरः क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेनेच 300 कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी आपल्या सासऱ्याच्या खुनाची सुपारी दिली आणि हत्या घडवून आणल्याची घटना घडली आहे. आपल्याच ड्रायव्हरला एक कोटी रुपये देऊन तिने सासऱ्याचा काटा काढला आहे. सुरवातीला अपघात दिसणाऱ्या या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि हा गु्न्हा उघडकीस आला.

पुरुषोत्तम पुट्टेवार (वय 82, रा. नागपूर) असे मृत सासऱ्याचे नाव आहे. पुरुषोत्तम पुट्टेवार हे 22 मे रोजी आपल्या घराबाहेर पडले. हातात एक पिशवी घेऊन ते रस्त्याच्या कडेने चालत होते. त्यावेळी एक भरधाव कारने पुरुषोत्तम यांनी चिरडले होते. सुरवातीला ही घटना हिट अँड रन प्रकरण वाटले होते. पण, पोलिसांना संशय आला आणि घटना उघडकीस आली.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पुरुषोत्तम यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, मुलगी, एक मुलगा आणि सून आहे. मुलगा मनिष पुट्टेवार हे डॉक्टर आहेत. सून सरकार नोकरी करते. कन्या योगिता हिचे लग्न झाले आहे. पुरुषोत्तम यांनी वडिलोपार्जित तब्बल 300 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. पुरुषोत्तम यांचा मृत्यू अपघातात झाला असे अनेकांना सुरवातीला वाटले. मात्र त्यांच्या चुलत भावाला संशय आला. लागलीच त्यांनी वरिष्ठ पोलिसांची भेट घेतली आणि तिथून या प्रकरणाला नवी दिशा आली.

पोलिसांनी प्रथम त्यांच्याच घरातील दोन कार चालकांना ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी केली असता दोघं बोलते झाले. नीरज आणि सचिन अशी या कार चालकांची नावे आहेत. सचिनने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविल्यावर हा कट कसा रचला, कुणाच्या सांगण्यावरून रचला हे सर्व सांगितले.

पोलिसांनी पुरुषोत्तम यांच्या सुनबाई अर्चना हिला तात्काळ ताब्यात घेतले. पुरुषोत्तम यांच्या मृत्यूचा सगळा कट हा अर्चना हिने रचला होता. घरातील 2 चालकांना तिने तब्बल 1 कोटी रुपयांचे प्रलोभन दिले. एवढी मोठी रक्कम ऐकून दोघांचे डोळे फिरले आणि दोघांनी मिळून आपल्याच मालकाचा काटा काढला. पुरुषोत्तम पुट्टेवार हे आपली सगळी प्रॉपर्टी लेक योगिता आणि तिच्या मुलांच्या नावे करणार असल्याची कुणकुण अर्चनाला लागली. त्यानंतर अर्चनाच्या डोक्याचा पारा चढला होता. अर्चनाने दोन कार चालकांना हाताशी घेऊन सासऱ्यांचा जीव घेतला. पण, पोलिसांनी प्रकरण उघड केले आणि अर्चनाला अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबई विमानतळावर महिलांची सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारी चक्रावले…

प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने केली मुलाची हत्या…

संतापजनक! बापाने चिमुकलीला जमीनीवर जोरात आपटून मारले…

महाराष्ट्र हादरला! प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून केला खून…

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण! विशाल अगरवाल याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!