
पुणे शहर अपघातातील धनिकपुत्रासह बापाचाही नवा दावा…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे पोर्शे कारला झालेल्या अपघातावेळी मी नाही, तर आमचा ड्रायव्हर गाडी चालवत होता, असा दावा अल्पवयीन आरोपी आणि त्याच्यासोबत गाडीत असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी केला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी हा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, अल्पवयीन आरोपीचा वडील बिल्डर विशाल अगरवाल याने देखील त्याच्या जबाबत असाच दावा केल्याची माहिती पुढे आली आहे.
पुणे पोर्शे अपघात प्रकरणी सध्या नवनवीन खुलासे समोर येत आहे. याप्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह तीन आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली. आज त्यांची कोठडी संपत असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…
एका इंग्रजी वृत्तसमुहाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. ‘अपघाताच्या वेळी मी गाडी चालवत नव्हतो, तर आमचा चालक गाडी चालवत होता, असा दावा पुणे पोर्शे कार अपघातातील 17 वर्षीय अल्पवयीन आरोपी आणि गाडीतील त्यांच्या दोन मित्रांनी जबाबात दिल्याची माहिती आहे. आरोपीचा बाप बिल्डर विशाल अग्रवाल यानेही अपघाताच्या वेळी आमचा फॅमिली ड्रायव्हर पोर्शे कार चालवत होता, असा दावा केला आहे. दोघांच्या वक्तव्यानंतर बापलेकाची जोडगोळी पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.’ पण, धनिकपुत्राने दोन जणांना चिरडल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी संबंधित घटना व्हिडिओमध्ये कैद केली होती. शिवाय, अल्पवयीन आरोपीला चांगलाच चोप दिला होता.
धनिकपुत्र आणि पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपी कोझी पबमध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता. पार्टीनंतर पबमधून बाहेर आल्यानंतर कार चालवण्याच्या अवस्थेत नसल्याचे पाहून ड्रायव्हरने विशाल अगरवाल फोन केला. त्याला गाडी चालवू देत, असे विशाल अगरलवाल याने स्वतः सांगितल्याचा दावा चालकाने केला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात चालकाने ही माहिती दिल्याचे समोर आले आहे.
पुणे शहरातील अपघातानंतर संतापजनक रॅप! आईचा खुलासा…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…
धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…
पुणे अपघात प्रकरणानंतर सोनाली तनपुरे यांचे ट्विट व्हायरल…
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…
Video: पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर कुटुंबियांचा राग अनावर…
पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…
पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…
पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

