भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…

नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात शुक्रवारी (ता. २७) रात्री उशीरा दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा गुन्हा हा आर्थिक फसवणुकीचा आहे. यापैकी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अशोक खरात याने संबंधित महिलेवर त्याच्या नेहमीच्या पद्धतीनेच म्हणजे दैवी अवतार असल्याचे सांगून आणि तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

पती आणि पत्नी दोघेही संसारात विघ्न येत असल्याने अशोक खरात याच्याकडे गेले होते. 2013 साली या दोघांचे लग्न झाले होते. मात्र, या दोघांमध्ये वाद असल्याने ते एकत्र राहत नव्हते. एका व्यक्तीच्या सांगण्यावरुन संसार सुरळीत करण्यासाठी हे दोघे अशोक खरात याच्याकडे गेले होते. 2022 साली हे दोघे पहिल्यांदा अशोक खरात याच्याकडे गेले. त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा ते अशोक खरात याच्याकडे गेले. त्यावेळी अशोक खरात याने पतीला केबिनच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर पत्नीला तांब्याच्या भांड्यातून पाणी द्यायला देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ‘तू ही गोष्ट कोणाला सांगितली तर मी महादेवाचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझ्या मुलांना मारुन टाकेन, उद्ध्वस्त करेन’, अशी धमकी अशोक खरात याने या महिलेला दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दोघे जेव्हा 2022 साली पहिल्यांदा अशोक खरात याच्याकडे गेले तेव्हा त्याने या दोघांना लग्नाची तारीख विचारली. ही तारीख सांगितल्यावर अशोक खरात याने तुमचं लग्न चुकीच्या दिवशी झाल्याचे सांगितले. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होत असल्याचे तो म्हणाला. त्यानंतर हे दोघे जवळपास सहा ते सात वेळा अशोक खरात याच्याकडे गेले. ऑगस्ट 2024 मध्ये अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यलयात गेले असता त्याने पतीला केबिनबाहेर बसायला सांगितले आणि महिलेला ताब्यांच्या भांड्यातील पाणी प्यायला देऊन अत्याचार केला. ऑगस्ट 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत चार वेळा बळजबरीने गैरकृत्य केल्याची फिर्याद महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

अशोक खरात याच्याविरोधात आतापर्यंत सरकारवाडा पोलिसात एकूण 10 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील 2 आर्थिक फसवणुकीचे आणि 8 महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत. राजेंद्र जासूद आणि राजेंद्र भागवत यांनी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा विरोधात पोलिसांकडून मोठी कारवाई सुरु करण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी नव्याने 65 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पिडीत महिलांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिला अत्याचारसंदर्भात असंवेदनशीलता दाखविणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांची करवाई सुरु आहे. आतापर्यंत 74 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याआधी कोपरगावमध्ये 3 जणांच्या विरोधात तर नाशिक पोलिसांनी 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. व्हिडिओ व्हायरल करण्यासंदर्भात तीन दिवसांतच 74 जणांवर कारवाई झाली आहे. नाशिक शहरात फेसबुक आणि इंस्टाग्रा च्या 65 प्रोफाईल धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आक्षेपार्ह व्हिडिओ कोणीही व्हायरल करू नका, असे आवाहन नाशिक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…

भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…

महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…

सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…

नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…

नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…

अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…

नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…

अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…

नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…

नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…

नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…

नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…

नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…

नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…

कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…

फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!