
सीमा हैदर हिचा नवरा गुलाम भारतात येणार; मोठं कारण समोर…
नवी दिल्ली : पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर हिचा नवरा गुलाम हैदर हा भारतात येणार आहे. गुलाम हैदर याने सीमा हैदर, सचिन मीणा आणि त्यांचे वकील डॉक्टर एपी सिंह यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यासंदर्भांत साक्ष देण्यासाठी तो उत्तर प्रदेशातल्या गौतमबुद्धनगरच्या सूरजपूर सेशन कोर्टात आपली साक्ष नोंदवण्यासाठी येणार आहे. मानहाीनीचा खटला दाखल केल्यानंतर न्यायालयाने गुलाम हैदर याला साक्ष नोंदवण्यासाठी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
गुलाम हैदर याने ग्रेटर नोएडामधील न्यायालयात आपले भारतीय वकील मोमिन मलिक यांच्या मदतीने आपली पत्नी सीमा हैदर, सचिन मीणा आणि त्यांचे वकील एपी सिंह यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. गुलाम हैदरचे वकील मोमिन मलिक हे हरियाणाचे एक प्रसिद्ध ज्येष्ठ वकील आहेत. त्यांनी सांगितले आहे की, साक्ष नोंदवण्यासाठी सूरजपूर न्यायालयाकडून गुलाम हैदरला नोटीस जारी करण्यात आली आहे. गुलाम हैदर हा दहा जूनला साक्ष नोंदवण्यासाठी भारतात येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने जर गुलाम हैदर याची साक्ष ग्राह्य धरली तर तिघांनाही कामीत कमी तीन वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
गुलाम हैदर म्हणाला, ‘माझे वकील मोमिन मलिक यांच्या वतीने मानहानीची याचिका दाखल केली आहे. त्यावर झालेल्या युक्तिवादानंतर या याचिकेची न्यायालयाकडून दखल घेण्यात आली आहे. आता यावरील पुढील सुनावणी 10 जूनला होणार आहे. न्यायालयीन लढाईच्या पहिल्या टप्प्यात आपला विजय झाला आहे.’
Video: पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ समोर…
Video: सीमा हैदर हिने देवाला हात जोडून घातलं साकडं; म्हणाली…
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिने गरोदरपणाबाबत केला खुलासा…
पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…
सीमा हैदर हिला सचिन आवडत नाही तर दुसरीकडे बीडी पिण्याचे व्यसन…
सीमा हैदर बाबत पाकिस्तानी बालमैत्रीणीचा गौप्यस्फोट…
सीमा हैदर प्रियकरासाठी भारतात दाखल अन् पाकमधील मंदिरांत सन्नाटा….
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

