
भंडारा हादरला! बहिणीच्या चारित्र्यावर संशय आला अन् पुढे…
भंडारा : सख्या भावानेच चारित्र्यावर संशय घेत लहान बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील सोनूली येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अश्विनी बावनकुळे (वय 20) असे मृत बहिणीचे नाव असून, आरोपी आशिष गोपीचंद बावनकुळे (वय 20) या भावाला पोलिसांनी अटक केली आहे.
मोठा भाऊ आशिष हा लहान बहीण अश्विनी हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि भांडणांचे रुपांतर वादात झाले. संतापलेल्या आशिषने अश्विनीला बेदम मारहाण केली. या मारहाणीतच अश्विनीचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती पोलिसांना समजल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून, आशिष बावनकुळे याला अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, सख्या भावाने बहिणीचा खून केल्याची घटना परिसरात समजल्यानंतर खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्हा हादरला! विवाहितेचे हातपाय बांधून शेततळ्यात बुडवलं…
पुणे शहरात पत्नीचा छातीत जोरात बुक्क्या मारून केला खून…
भावाबहिणीच्या नात्याला काळीमा! अल्पवयीन बहिण गरोदर…
पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या…
बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून चाकूने सपासप वार करून हत्या…
धक्कादायक! जावयाने पत्नीच्या संशयावरून आख्खी सासुरवाडी संपवली…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

