पुणे शहरात पत्नीचा छातीत जोरात बुक्क्या मारून केला खून…

पुणे: पत्नीने जेवण न दिल्यामुळे पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना कात्रज भागातील दत्तनगर परिसरात घडली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी तानाजी कांबळे नावाच्या नवऱ्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुरा तानाजी कांबळे (वय 42, रा. स्वामी समर्थनगर, दत्तनगर, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मुलगा पियूष तानाजी कांबळे (वय 19) याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवरा व्यावसायाने पेंटर असून रोजंदारीवर काम करत होता. कांबळे दररोज घरी येताना मद्यपान करून येत असे. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास तानाजी नेहमीप्रमाणे मद्यपान करून घरी आला होता. यावेळी त्याने पत्नीला जेवायला वाढण्यास सांगितले. यावर तिने त्याला जेवण न बनवल्याचे उत्तर दिले. जेवण न दिल्याच्या रागातून तानाजीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरवात केली. यादरम्यान त्याने पत्नी मधुराच्या छातीवर जोर जोरात बुक्क्या मारल्या. या मारहणीनंतर माधुरी खाली कोसळली. मारहाणीत मधुरा गंभीर जखमी झाली आणि यामध्ये मृत्यू झाला.

भारती विद्यापीठ पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहे.

kashmir
पुणे पोलिस! साडेतीन वर्षांनतर उलगडले महिलेच्या खुनाचे रहस्य…

पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या…

पुणे शहरात युवकाचा लाथा बुक्क्यांनी मारहाण करून खून…

पुणे हादरले! एकटेपणाला कंटाळून आजोबांनी घेतला जगाचा निरोप…

पुणे शहरात पत्नीने चिकन न दिल्याने चिमुकलीच्या डोक्यात घातली वीट…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!