
पुणे जिल्हा हादरला! विवाहितेचे हातपाय बांधून शेततळ्यात बुडवलं…
पुणे : विवाहित महिलेचे हातपाय ओढणीने बांधून त्यानंतर तिला शेततळ्यात बूडवून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बारामती जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी सासरच्या चौघांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे.
बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत तीचे हातपाय ओढणीने बांधत शेततळ्यात बुडवून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सासरच्या चौघांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. सुरेखा भाऊसाहेब गडदरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासू ठकूबाई महादेव गडदरे (रा. मासाळवाडी), नणंद आशा सोनबा कोकरे व नंदाई सोनबा चंदर कोकरे (रा. कुतवळवाडी, ता. बारामती) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी नामदेव बबन करगळ (रा. गिरीम, ता. दौंड) यांनी वडगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. रविवारी (ता. २४) पहाटेच्या सुमारास मासाळवाडी परिसरात असलेल्या एका शेततळ्यात ही घटना घडली आहे. पीडित विवाहितेला चौघांनी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला, त्यानंतर पती भाऊसाहेब व सासू ठकूबाई यांनी तिचे दोन्ही हात लाल रांगाच्या ओढणीने बांधून घराजवळील शेतळ्यात तिला बुडून मारल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. दरम्यान, या घटनेबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात पत्नीचा छातीत जोरात बुक्क्या मारून केला खून…
अविवाहीत गरोदर युवतीला घरच्यांनी जाळले जिवंत…
नवविवाहीत पत्नीला माहेरी सोडून आला अन् घेतला मोठा निर्णय…
हृदयद्रावक! गरोदर महिलेची आत्महत्या; पोटातील बाळही दगावले…
महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, गुन्हा दाखल…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

