
पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…
पुणे: लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवाल (वय २४) या युवकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा अपघात नसून एक पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचे उघड झाले आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या मित्राच्या मदतीनं त्याला दरीत ढकलून दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत केतन अग्रवाल हा प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. त्याचे लग्न मार्केटयार्डातील मसाल्यांचे मोठे व्यापारी गोयल यांची कन्या सिया गोयल हिच्याशी ठरले होते. या दोन्ही मोठ्या व्यावसायिक कुटुंबांमध्ये हा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार होता. जयपूर येथे या ‘बिग फॅट वेडिंग’चं आयोजन करण्यात आले होतं. या लग्नासाठी दोन विमानं बूक करण्यात आली होती. मात्र, लग्नाआधीच युवकाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
View this post on Instagram
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचे नव्हते. हा विवाह तिला मान्य नसल्यामुळे तिने केतनला वाटेतून हटवण्याचा कट रचला. यासाठी तिने आपल्या एका मित्राची मदत घेतली. ठरलेल्या कटानुसार, केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आलं आणि तिथे योग्य संधी साधून सियाने आपल्या मित्रांच्या मदतीने केतनला थेट खोल दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. यात केतनचा जागीच मृत्यू झाला आहे. सुरुवातीला हा ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात असल्याचा संशय होता, मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपास केला असता सिया आणि तिच्या मित्रांनी कट रचून हा प्रकार घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीचा गुरुवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त दोघांनी सकाळीच लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जाण्याचा बेत आखला होता. दोघेही सकाळी लवकर गडावर पोहोचले. किल्ल्यावर भटकंती सुरू असताना छायाचित्रे काढत होते. किल्ल्यावरील दरीच्या बाजूला उभे राहून केतन एका फोटोसाठी पोज देत होता. मात्र, गडावरील पृष्ठभाग निसरडा झाला होता. फोटो काढत असतानाच अचानक निसरड्या जागेवरून केतनचा पाय घसरला आणि तो थेट खोल दरीत कोसळला होता. लग्नासाठी त्याच्या कुटुंबीयांनी जयपूर येथे 17 कोटी रुपये खर्च करून पॅलेस बुक केले होते. तर पाहुण्यांना जयपूर येथे घेऊन जाण्यासाठी दोन विशेष विमानांची सोय केली होती.
पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…
प्रसिद्ध डॉक्टरने स्वतःला इंजेक्शन टोचून केली आत्महत्या; धक्कादायक माहिती समोर…
पुणे शहरात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; गॅलरीतून उडी मारताना महिलेचा मृत्यू…
पुणे! संक्रांतीच्या दिवशीच ट्रकच्या धडकेत सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू…
पुणे! नवीन थारने कोकणात जाताना अपघातात सहा मित्रांचा मृत्यू; पाहा नावे…
पुणे! नवले पूल अपघतात अभिनेत्याचा मृत्यू! चिमुकला झाला पोरका…

