
पुणे शहरात अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाने केला अत्याचाराचा प्रयत्न…
पुणे: पुणे शहरातील पर्वती परिसरात एका 50 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आरोपी पीडित मुलीचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. संबंधित व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर पीडितेला मेडिकलसाठी ससूनमध्ये नेण्यात आले आहे.
पर्वतीच्या पायथ्याला नऊ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपीने चिमुकलीचे कपडे काढून लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. हा प्रकार नागरिकांनी पाहिल्याने अनर्थ टळला. नागरिकांमुळे पीडितेची नरधमाच्या तावडीतून सूटका झाली. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मात्र आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत स्थानिकांनी पर्वती पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली. मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांनी नागरिकांना शांत केले.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील नसरापूरमध्ये अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरला. आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला. लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल देऊ नये असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. त्यासाठी कायद्यात योग्य तो बदल करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विधी-न्याय विभागाला दिले आहेत.
संतापाची लाट! नसरापुरातील आरोपीने कोंबड्या, बकऱ्यांनाही सोडले नाही…
महाराष्ट्र दिनी पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर ठेचून केली हत्या…
पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
पुणे! युवकावर अत्याचार करणाऱ्या गौरीचा आणखी एक प्रताप समोर…
पुणे! IT इंजिनिअर युवतीवर मित्रांनी केला सामूहिक अत्याचार अन्…

