पुणे शहरातील 11 पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल; पाहा नावे…

पुणे : आंबेगाव पठार पोलिस चौकीत आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवून बेदम मारहाण केल्याप्रकरणी अखेर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या फॅक्ट फाईंडिंग रिपोर्टनंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात 11 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात अल्पवयीन मुलांना मारहाण प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात 11 पोलिसांवर FIR नोंदवण्यात आला आहे. आंबेगाव पठार पोलिस चौकीत 20 ते 21 जुलै 2026 रोजी घडलेल्या प्रकाराबद्दल मानवाधिक आयोगाने संताप व्यक्त करत गुन्हा निर्देश करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी, पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे संकेत सतिश गोसावी यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर, मानवी हक्क आयोगाच्या सुमोटो Case. No. 4848/13/23/2026 आणि 4774/13/23/2026 च्या आदेशान्वये कारवाई करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पोलिसांनी 20 जुलै रोजी 4 अल्पवयीन मुलांना आंबेगाव पठार चौकीत आणलं होतं. तर, 21 जुलै रोजी पुन्हा 4 जणांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे, एकूण 8 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवून बेल्टने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. येथे बालकल्याण पोलिस अधिकारी नसताना, API स्नेहल थोरात यांनी अहवाल लिहिला. त्यानुसार, गु.र.नं. 383/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पण, मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर न करता पोलिस कोठडीत ठेवले. याप्रकरणातील अल्पवयीन मुले 1, 3, 7 आणि 8 हे अनुसूचित जातीचे असल्याने त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप देखील पोलिसांवर करण्यात आला आहे. जाणीवपूर्वक सार्वजनिक ठिकाणी अपमानित केल्याचा ठपका ठेवत अॅट्रॉसिटीचा दाखल झाला आहे.

दरम्यान, एका प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना तीन दिवस डांबून ठेवल्याबद्दल आणि दुसऱ्या एका प्रकरणात अल्पवयीन आरोपींना कारच्या बोनेटला बांधून त्यांना मारहाण केल्याबद्दल पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील 11 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य मानवाधिकार आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना पुण्याचे पोलिस आयुक्तांसह तेरा पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देत स्थगिती मिळवली. त्यामुळे पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांना वगळुन भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील अकरा पोलिसांवर सी आय डी कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. अल्पवयीन मुलांना डांबून ठेवणे, त्यांची धिंड काढणे, त्यांना मारहाण करुन ती वैद्यकीय तपासणीत आढळून येऊ नये यासाठी पुरावे दडवण्याचा प्रयत्न करणे आणि एट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी, सुनील रामनंद हे तपास अधिकारी म्हणून काम करत आहेत.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे…
1) मानसिंग पाटील – वरिष्ठ पोलिस निरीक्षक
2) गणेश मोहिते – सपोनि
3) स्नेहल थोरात – सपोनि
4) निलेश मोकाशी – पोनि
5) सुनिल हनवटे – पोहवा
6) दिनेश टापके – पोहवा
7) मितेश चोरमोले – पोलिस अंमलदार
8) सागर बोरसे – पोलिस अंमलदार
9) सोहम रोडेकर – पोलिस अंमलदार
10) मंगेश पवार – पोलिस अंमलदार
11) स्वप्ना भिसे – महिला पोलिस अंमलदार

पुणे पोलिसांनी स्कॉर्पिओवरून बसवून काढली आरोपींची धिंड…

पुणे पोलिसांनी शिकवला वारकऱ्यांच्या वेशातील चोरट्यांना धडा…

Video : पुणे पोलिस दलातील PSI संदीप कदम यांचे निलंबन…

पुणे पोलिस दलातील पोलिसाचा प्रताप; कोम्बिंग ऑपरेशन कारण अन् पत्नीने पकडले रंगेहाथ…

पुणे पोलिस दलात एकच खळबळ! 32 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!