कोल्हापूर! प्रेमी युगुलाची घनदाट जंगलात गळफास लावून आत्महत्या…

कोल्हापूर: एका प्रेमी युगुलाने राधानगरीच्या घनदाट जंगलात एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघकीस आली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलीचा आणि एका युवकाचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील ओंकार बरगे नावाच्या युवकाचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही राधानगरी येथील जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आहेत. त्यांनी आत्महत्या केली ही त्यांच्यासोबत काही घातपात घडला? याबाबत आता संशय निर्माण झाला आहे.

Police-Book

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

राधानगरीच्या जंगलात शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास एकाच झाडाला दोन मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. स्थानिक नागरिकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवले आणि पंचनामा केला. प्रेमी युगुलाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घरच्यांचा विरोधा होता की अन्य काही वैयक्तिक कारण होते, याचा तपास पोलिस करत आहेत.

ओंकार बरगे आणि ती अल्पवयीन मुलगी एकाच गावातील असल्याने शेळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. राधानगरी पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणती चिठ्ठी लिहून ठेवली आहे का, याचाही शोध पोलिस घेत आहेत.

पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..

सांगली! प्रेमविवाह झालेल्या युवतीने संपवलं आयुष्य…

अनैतिक प्रेमसंबंध! महिलेच्या दिराने घरातील टाईल्स काढली अन्…

कोल्हापूर! ग्रामपंचायत सदस्याचा खून अनैतिक संबंधातून, चौघांना अटक…

कोल्हापूर! प्रियकराने लॉजवर पत्नीसारखीच केली प्रेयसीची क्रूरपणे हत्या..

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!