नाशिक! डॉ. मनीषा जेजूरकर प्रकरणात नवा ट्विस्ट; दाजीचं वागणं खूप बदललं…

नाशिक: डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्युप्रकरणी त्यांची बहीण रोहिणी थोरात यांच्या फिर्यादीवरून पती डॉ. नीलेश जेजुरकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या फिर्यादीमध्ये डॉ. स्वाती चव्हाण हिच्याही नावाचा उल्लेख असून अटक झालेला संशयित पती डॉ. नीलेश जेजूरकर आणि त्याची मैत्रिण डॉ. स्वाती चव्हाण या दोघांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

मनीषा यांच्या मृत्यूच्या 24 तास आधी काय घडलं होतं? याचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी आरोपी डॉ. नीलेश जेजूरकर आणि त्याची मैत्रिण डॉ. स्वाती चव्हाण या दोघांचेही मोबाइल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले असून, त्याच्या अहवालानंतर दोघांच्या पोलिस कोठडीची मागणी होणार आहे. तोपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चार दिवसांच्या पोलिस कोठडीत नीलेशने चौकशीदरम्यान पोलिसांच्या प्रश्नांची जेमतेम उत्तरे दिली असून स्वातीने मात्र सहकार्य केले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

तपासादरम्यान असं समोर आले की, 5 मार्च रोजी एका लग्नसमारंभात डॉ. मनीषा यांचा सार्वजनिकरित्या अपमान झाला होता. त्यानंतर दुसऱ्यादिवशी 6 मार्च रोजी मनीषा यांनी आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांना संशय आहे की, पती निलेश आणि डॉ. स्वाती यांचं विवाहबाह्य संबंध आणि लग्नसमारंभातील घटनेनंतर डॉ. मनीषा यांनी टोकाचे पाऊल उचललं असावं. पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून डॉ. नीलेश आणि डॉ. स्वाती यांचे एकमेकांच्या घरी येणं – जाणं वाढलं होतं. त्यामुळे दिवाळीत मनीषा आई-वडिलांकडे आली असताना तिनं ‘पती नीलेश विनाकारण त्रास देत आहे’, असे सांगितले अन् बहिणीने सांगितलं की, ‘तुझ्या दाजीचं वागणं खूप बदललं आहे’. तसेच मी खूप निराश झाले असून पुढे जगण्याची इच्छा संपली आहे, माझ्या मुलीचा सांभाळ कर, असे मनीषा आपल्या बहिणीला म्हणाली होती.

नाशिक! डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात प्रेमाचा अनैतिक अँगल; तू तुझ्या नवऱ्याला आवडत नाही…

नाशिक! महिला डॉक्टरच ठरली मनीषा जेजुरकरांच्या मृत्यूला कारण; प्रेमसंबंध…

नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणी माहेरच्यांकडून गंभीर आरोप…

नाशिक! प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या…

नाशिक! प्रसिद्ध डॉ. मनिषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…

नाशिक! विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वळण, रिसॉर्टवर प्रियकराने घेतला जीव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!