भारत हल्ल्याचा नुसताच इशारा देतो; पण अद्याप काही झालेले नाही…

इस्लामाबाद (पाकिस्तान): भारताच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून उच्चस्तरीय बैठका सातत्याने सुरू आहेत. भारताच्या केंद्रीय गृहमंत्रालयाने नागरिकांसाठी युद्धजन्य परिस्थितीत काय करावे, याचे मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भारत कधीही LOCवर सैन्य कारवाई करू शकतो, असा दावा आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे.

इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले, ‘भारत कधीही नियंत्रण रेषेवर (LOC) कुठल्याही क्षणी हल्ला करू शकतो, अशा बातम्या मिळत आहेत. मात्र, पाकिस्तानही त्याला सडेतोड उत्तर देईल. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही चौकशी केल्यास हे उघड होईल की या हल्ल्यामागे भारत स्वतः की अंतर्गत कोणता गट जबाबदार आहे, आणि त्यामुळे भारताने लावलेले निराधार आरोप खोटे असल्याचे सिद्ध होईल. हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री अत्ता तरार यांनीही असाच इशारा दिला होता की, भारताचे हल्ले 24 ते 36 तासांत होऊ शकतात. मात्र, अद्याप तसा कोणताही हल्ला झालेला नाही.’

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सैयद असीम मुनीर यांनी 5 मे रोजी देशाच्या प्रतिष्ठेचे आणि जनतेच्या सुरक्षेचं रक्षण करण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर दिले जाईल, असे सांगितले. दरम्यान, भारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना 7 मे 2025 रोजी राष्ट्रीय पातळीवरील मॉक ड्रिल राबवण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन प्रतिसाद आणि युद्धसज्जतेची चाचणी करण्याचा यामागील उद्देश आहे.

Video: पाकिस्तानची उडाली झोप! मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद…

काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानमधील…

पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…

भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…

भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…

Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…

विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…

Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…

Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…

Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…

Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…

पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!