
Cyber Crime! ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणारे ताब्यात…
पुणे (सुनिल सांबारे): पुणे शहरातील एका व्यक्तीला ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रार दाखल केली. पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने तपास करून आरोपींना जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुण्यातील एका सेवानिवृत्त व्यक्तीला ‘Angel bloc Pro’ या नावाचे अॅप्लिकेशन चे धारक / वापरकर्ते यांनी शेअर ट्रेडींग प्लॅटफॉर्म द्वारे शेअर ट्रेडींग केल्यास चांगला नफा मिळेल असे अमिष दाखवून “Go all out” व्हॉटसअॅप ग्रुप मध्ये अॅड करुन सदर ग्रुपमधील इतर सदस्यांनी त्यांना भरगोस नफा मिळाल्याचे स्क्रिनशॉट पोस्ट करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणुक करण्यास प्रोत्साहीत करुन विविध कंपन्यांचे शेअर्स व आयपीओ खरेदी करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांना विविध बँक खात्यावर एकूण १,९३,२१,०५४/- रूपये भरण्यास भाग पाडून कोणतीही परतावा न देता यांची आर्थिक फसवणूक म्हणून सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे गु.र.नं.४०/२०२५, बीएनएस २०२३ चे कलम ३१६ (५), ३१९ (२), ३१८ ( ४ ) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ डी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या गुन्हयाचे तपासामध्ये सायबर पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासाचे साहाय्याने नमुद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असतांना सायबर पोलिसांना गुन्ह्यातील आरोपीतांनी वापरलेले बँक खाते धारकाची माहितीचे तांत्रिक विश्लेषन केले असता सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी
१) जीवन रामचंद्र सावंत (वय २८ वर्षे, धंदा- नोकरी, रा. बाळूमामा मंदिरा जवळ, वान्लेसवाडी, मिरज सांगली ४१६४१४. मुळ पत्ता रेणूका कॉलनी, गोवे प्लॉट, वखार भाग, मिरज सांगली ४१६४१०).
२) पवनकुमार रामचंद्र सावंत (वय- २६, धंदा – नोकरी, रा. जुना हरिपुर रोड, गंगानगर, मिरज सांगली ४१६४१०)
३) जियाऊद्दीन ताजुद्दीन मुल्ला, वय – ३९ वर्षे, धंदा- बेरोजगार, रा सनदे गल्ली, उर्दु हायस्कुलचे उजवे बाजुस, शिरोळी पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)
यांना २२/०४/२०२५ रोजी अटक करण्यात आली होती. त्यांचा ०४ दिवस पोलिस कोठडी घेवुन तपास करण्यात आला तसेच आरोपी क्र.
४) अतिक पिरमोहम्मद शेख (वय – ३१, धंदा – हॉटेल व्यवसाय, रा- २७, राम आळी, राम मंदिर जवळ, शिरुर, पुणे) यास सायबर पथकाने सापळा लावुन गुन्ह्यातील पाहीजे आरोपी हे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवून सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे आणून २८/०४/२०२५ रोजी अटक करण्यात आले आहे. त्यास न्यायालयाने दि. ०१/०५/२०२५ रोजी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्यात आरोपीतांनी वापरलेली बँक खाती ही भारतातील एकुण
१२ राज्यातुन फ्रिज झाल्याची माहिती प्राप्त असून पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीत भारतातील एकुण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कारवाई अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, सह पोलिस आयुक्त, पुणे शहर, शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस आयुक्त, पुणे शहर, विवेक मासाळ, पोलिस उप-आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, मच्छिंद्र खाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली व. पो. नि. स्वप्नाली शिंदे, पो.नि. संगिता देवकाते, तपासी अधिकारी, पोलिस उप-निरीक्षक, हिमालय जोशी, सहा पोलिस उपनिरीक्षक, संदेश कर्णे पोलिस अंमलदार अमर बनसोडे, राजुदास चव्हाण, सतिशकुमार मांढरे, किरण जमदाडे, दिनेश मरकड, प्रविणसिंग राजपुत, अनिकेत भिंगारे, सचिन शिंदे या पोलिस पथकाने यशस्वी रित्या पार पाडली.
दरम्यान, ऑनलाईन पध्दतीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख निर्माण करणारे अनोळखींवर शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक, डिजीटल अरेस्ट यासारखे प्रकार तसेच बक्षिसाचे, नोकरीचे, लॉटरीचे, लोन मंजूर करण्याचे अमिष दाखवून पैसे भरावयास लावणाऱ्या गुन्हेगारी टोळयांपासून नागरीकांनी सावध राहून अशा अमिषांना बळी पडू नये, अशा घटनांबाबत तात्काळ सायबर पोलिस स्टेशन, शिवाजीनगर, पुणे येथे संपर्क करावा, असे पुणे शहर पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
पुणे शहरात बनावट नोटा छापणा-या टोळीचा सायबर पथकाकडून पर्दाफाश…
सायबर मर्डर! पुण्यातील उद्योगपतीचं पटना एअरपोर्टवरून अपहरण अन् हत्या…
Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…
Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…
Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…

