
नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढतेय गुन्हेगारी; युवकाचा खून…
नाशिक: नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून, हत्येचे सत्र सुरूच सुरूच आहे. नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागात एकाचा खून करण्यात आला आहे. तर हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. रितेश डोईफोडे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर हल्लेखोर स्वतःहून नाशिकरोड पोलिसांना शरण आल्याची माहिती मिळत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नाशिकरोड परिसरातील जेलरोड या ठिकाणी दोन युवकांवर मध्यरात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रितेश डोईफोडे याचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
जुन्या भांडणातून रितेश डोईफोडे आणि त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. डोक्यात दगड घालून धारदार शस्त्राने वार करत केलेल्या हल्ल्यात रितेशचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र या हल्ल्यात गंभीर जखमी आहे. हल्लेखोर स्वतः नाशिक रोड पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना शरण आला आहे. याबाबत नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहे.
नाशिक! बापाने पोटच्या मुलाचा गळा दाबला अन् मृतदेह गोणीत भरून…
मुळशी पटर्न! नाशिकमध्ये तडीपार सराईत गुंडाला टोळक्याने घरात घुसून संपवलं…
नाशिक! सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची मन हेलावून टाकणारी चिठ्ठी…
नाशिकमध्ये दोन सख्ख्या भावांची कोयत्याचे सपासप वार करून हत्या…
नाशिकमध्ये मोकळ्या जागेत मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ…
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

