पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)
दानिश इसाल मन्सुरी हे गेल्या १० वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. कुटुंबाची व्यावसायिक पार्श्वभूमी, परंतु वेगळे काही तरी करण्याच्या इच्छेमुळे स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात वयाच्या २२व्या वर्षी पोलिस अधिकारी झाले. पोलिस दलात आल्यानंतर भविष्यातील चोरीचे प्रकार ओळखून सायबर क्राईममध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि विविध गुन्हे उघड केले. त्यांच्याविषयी थोडक्यात…

दानिश मन्सुरी यांचे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील सटाणा गावात बालपण गेले. एकत्र कुटुंबातील जन्म. कुटुंबातील कोणीही पोलिस दल अथवा नोकरीमध्ये नाही. कुटुंबाची व्यावसायिक पार्श्वभूमी. अभ्यासात हुशार असल्यामुळे दहावी, बारावीला चांगले गुण मिळाले. पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर यांच्यापासून प्रेरणा घेतली आणि पोलिस अधिकारी होण्याचे ठरवले. पुणे शहरात जाऊन कोणताही क्लास न लावता फक्त नऊ महिने अभ्यास केला आणि परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर सायबर क्राइमवर लक्ष केंद्रित केले आणि अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत.

कुटुंबाविषयी…
दानिश मन्सुरी हे आई-वडिलांना एकुलते एक. चाळीस जणांचे एकत्र कुटुंब. कुटुंबातील प्रत्येक जण शिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय सांभाळत आहे. कुटुंबातील कोणीही नोकरी करत नाही. व्यवसायामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पहिल्यापासून चांगली. आपल्या मुलाने हिशोब करता येईल एवढे मराठी शिक्षण पूर्ण करून व्यवसाय सांभाळावा, ही वडिलांची इच्छा. परंतु, आई कडक शिस्तीची. मुलाने इंग्रजी शिक्षण घ्यावे आणि व्यवसायात न उतरता मोठे अधिकारी व्हावे, अशी आईची इच्छा. आईच्या इच्छेखातर दानिश यांची शैक्षणीक वाटचाल सुरू झाली आणि यश मिळत गेले.

कॉलेजला प्रवेश…
दानिश मन्सुरी यांना दहावी, बारावीला चांगले गुणे मिळाले होते. कॉलेज पूर्ण करण्यासाठी तालुक्याच्या गावावरून नाशिक शहरात प्रवेश केला. महाविद्यालयात प्रवेश घेताना बीए इंग्रजी विषय निवडला. कॉलेज करत असताना बीए पूर्ण केल्यानंतर बीएवर आपल्याला नोकरी कोण देणार? असा प्रश्न पडला. मित्रांमध्ये चर्चा होऊ लागली. दरम्यानच्या काळात पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर यांचा परिसरामध्ये मोठा पगडा होता. त्यांच्याप्रमाणे आपणही पोलिस अधिकारी व्हावे, असे मित्रांनी ठरवले होते.

पुणे अन् नऊ महिने अभ्यास…
नाशिकमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर धनंजय पवार, स्वप्निल भांबरे आणि दानिश मन्सुरी या तिन मित्रांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुणे शहरात जाण्याचा निर्णय घेतला. पुणे शहरात दाखल झाल्यानंतर कोणताही क्लास न लावता अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. रात्रंदिवस अभ्यास सुरू केला. नऊ महिन्यानंतर स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले. पोलिस उपनिरीक्षक झाल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयांनाही मोठा आनंद झाला. ‘नऊ महिने मोठी मेहनत घेतली होती. अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे कुठेही फिरलो नाही. साधा बटणाचा मोबाईल जवळ असल्यामुळे वेळही वाचला आणि पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार झाले,’ असे दानिश मन्सुरी सांगतात.

एका क्षेत्रात तज्ज्ञ…
पोलिस दलात दाखल झाल्यानंतर प्रशिक्षण घेतल्यानंतर गडचिरोली येथे काम करत असताना खूप काही शिकायला मिळाले. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देता आला. परंतु, कोणत्या तरी एका क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असले पाहिजे, असे वरिष्ठ अधिकारी बोलले होते. अन् त्याच क्षणी पोलिस दलातील एक क्षेत्र निवडून त्यामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. सायबर क्राइममध्ये काम करण्याची आवड असल्यामुळे त्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरवले आणि अभ्यासासह काम सुरू केले. सायबर क्राइमध्ये गेल्या सहा वर्षांपासून काम करत असून, विविध गुन्हे उघड केले आहेत. त्यापैकी काही निवडक गुन्हे पुढीलप्रमाणे…

विमानातून प्रवास अन् महागले हॉटेल…
परराज्यातील चोरटे विमानाने प्रवास करून मुंबईत आल्यानंतर महागड्या हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी थांबायचे. एका व्यक्तीला क्रेडिट कार्डवर पॉइंट वाढवून देतो म्हणून सहा लाख रुपयांची फसवणूक केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर दानिश मन्सुरी यांनी तपास सुरू केला. चोरट्यांनी सहा लाखांवर डल्ला मारल्यानंतर एका स्टोअरमधून वस्तू खरेदी केल्या होत्या. दानिश मन्सुरी यांनी संबंधित स्टोअरसोबत संपर्क साधला आणि माहिती घेतली. शिवाय, स्टोअरमध्ये नवीन वस्तूंची ऑर्डर दिल्यानंतर संपर्क साधण्यास सांगितले. चोरटे वस्तू घेण्यासाठी आल्यानंतर माहिती मिळाली. सापळा रचल्यानंतर एकाला ताब्यात घेण्यात आले. पुढे तपासादरम्यान दोघांना सुरत, दोघांना डेहराडून, एकाला दिल्ली आणि एकाला हरियानामधून अटक करण्यात आली. आरोपींनी विविध भागांमधील नागरिकांची तब्बल ३० लाख रुपयांची फसवणूक केली होती. दानिश मन्सुरी यांनी उत्कृष्ठपणे तपास करून चोरट्यांना गजाआड केले.

नायजेरियन चोरटा अन् तेल…
नायजेरियन चोरट्याने एका व्यक्तीसोबत संपर्क साधून औषधी वनस्पती तेलांची मागणी केली होती. सॅंपल तेल घेऊन दिल्लीला बोलावले होते. दिल्लीत गेल्यानंतर एका अमेरिकन व्यक्तीने त्यामधील १० एमएल तेल घेऊन दीड लाख रुपये दिले. संबंधित व्यक्तीचा विश्वास संपादन केला. शिवाय, पुढची ऑर्डर दिली आणि अडव्हॉन्स म्हणून १९ लाख रुपये घेतले होते. काही दिवसानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुन्हा दाखल केला.

अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!