हृदयद्रावक! मुलीचा फोन पोलिस अधिकाऱ्यांनी उचलला अन् बसला धक्का…
लखनौ (उत्तर प्रदेश) : रेल्वेमधून सिलेंडर घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या चुकीमुळे आगीचा भडका उडाला आणि 10 जणांची होरपळून जीव गमावला. यामध्ये नात आणि आजीला जीव गमवावा लागला आहे.
लखनौ येथून रामेश्वरमला निघालेल्या भारत पर्यटक रेल्वेने शनिवारी सकाळी 5:15च्या सुमारास पेट घेतला. प्रवाशांनी जिवाच्या आकांताने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, 10 जणांना जीव गमवावा लागला. हिमानी (वय २२) आणि तिची आजी मनोरमा (वय ८०) देवदर्शनाला निघाली होती. मनोज अग्रवाल यांचे शुक्रवारी संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास फोनवरून मुलीशी आणि आईशी बोलणे झाले होते. त्यावेळी शनिवारी आम्ही भरपूर फिरणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत’, असे त्या म्हणाल्या होत्या.
मनोज यांनी मनोरमा यांना फोन केल्यानंतर धक्काच बसला. कारण, समोरून पोलिस अधिकारी बोलत होते. हा मोबाईल पोलिस स्थानकात जमा असल्याचं त्यांनी सांगितले. माझ्या मुलीचा मोबाईल पोलिस स्थानकात कसा गेला, या विचाराने मनोज यांना भीती वाटू लागली. त्यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. पाहता पाहता दुपार झाली, 12 वाजता टीव्हीवर अपघाताची बातमी आली. 2 वाजता मृतांची यादी जाहीर झाली आणि त्यात त्यांच्या मुलीचा आणि आईचा समावेश होता. मनोज मुलीच्या लग्नाची तयारी करत होते.
एक व्यक्ती सिलेंडर घेऊन रेल्वेत चढते आणि रेल्वे प्रशासन बघत बसतेय प्रशासन एवढ्या प्रवाशांचा जीव धोक्यात कसं घालू शकतं? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना जारी करण्यात आलेल्या मदतीबाबत ते म्हणाले, ‘माझी आई आणि मुलगी गेली, आता हे पैसे घेऊन मी काय करू…’
Video: लघनऊ-रामेश्वर रेल्वेला भीषण आग; नऊ प्रवाशांचा मृत्यू तर…
हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…
हृदयद्रावक! आईने पोटच्या दोन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत: लाही संपवलं…
हृदयद्रावक! ट्रकच्या धडकेत चिमुकलीसह माता-पित्याचा जागीच मृत्यू…
हृदयद्रावक! विश्वास नांगरे पाटील यांनी नितीन देसाईंबद्दलच्या भावनांना करून दिली मोकळी वाट…
हृदयद्रावक! क्षणभर छोट्या भावाला काहीच उमगलंच नाही…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…