पुणे! बिअरबारच्या बाहेर अ‍ॅम्बुलन्स पोहचताच केला गोळीबार; कारण पाहा…

पुणे: व्यसनमुक्ती केंद्रात मित्राला घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या अ‍ॅम्बुलन्सवर दारूच्या नशेत गोळीबार केला. केसनंद रोडवरील बकोरी येथे गुरूवारी (ता.11) रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे.

वाघोली पोलिसांनी गोळीबार केल्याप्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. विशाल रामदास कोलते (32, रा. बकोरी, ता. हवेली, जि. पुणे), संदिप कैलास हरगुडे (42) आणि अमोल राजाराम हरगुडे (36, दोघेही रा. केसनंद, ता हवेली, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका 35 वर्षाच्या व्यक्तीने वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संदीप हरगुडे याला दारूचे व्यसन आहे. त्याचे दारूचे व्यसन सोडविण्यासाठी त्याच्या घरच्यांनी व नातेवाईकांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. गुरूवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास संदीप हरगुडे हा त्याचे मित्र आरोपी विशाल कोलते, अमोल हरगुडे यांच्यासोबत बकोरी रोडवरील बिअरबारमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी त्याच्या घरच्यांनी बोलवलेली अ‍ॅम्बुलन्स संदीप हरगुडे दारू पित बसलेल्या बारच्या ठिकाणी गेली.

संदीप हरगुडे याला नेण्यासाठी अ‍ॅम्बुलन्स आल्याचे समजल्यानंतर विशाल कोलते याने त्याच्याकडील पिस्तुलातून अ‍ॅम्बुलन्सवर गोळीबार केला. अ‍ॅम्बुलन्सच्या काचा फोडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान दाखविल्याने अ‍ॅम्बुलन्स चालक बचावला. यावेळी घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी घटनास्थळी घाव घेतली. त्यानंतर लागलीच टिम तयार करून आरोपींना बेड्या ठोकल्या. तिघांवरही आता खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी व आर्मअ‍ॅक्टप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक वैजिनाथ केदार करत आहेत.

पुणे-सोलापूर रस्त्यावर लूटमार करायचे अन् पैसे कला केंद्रात उडवायचे; सहा जणांना अटक…

हृदयद्रावक घटनेने पुणे हादरले! नवजात बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधली अन्…

पुणे! चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेमप्रकरणातून भावाची हत्या…

पुणे! वडिलांना ‘टकल्या’ म्हणाला म्हणून दगडाने ठेचून केला खून…

पुणे! लिव्ह इनमधील प्रेयसीच्या खूनाचे कारण सांगितले आरोपीने…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!