इन्स्टाग्रामवरील प्रेम! महाराष्ट्राची लेकीच्या लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट…

भोपाळ (मध्य प्रदेश): इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं, पण या प्रेमाचा शेवट भयंकर झाला आहे. गोंदियाच्या एका युवतीची तिच्या नवऱ्याने गळा दाबून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह एका लोखंडी पेटीत बंद करून तो पाण्याच्या टाकीत फेकून दिला होता. १२ फेब्रुवारी रोजी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मूळची गोंदिया (महाराष्ट्र) येथील असलेली अशरफी ऊर्फ सिया (वय ३३) ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. इन्स्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स होते. यातूनच तिची ओळख भोपाळमधील समीर नावाच्या रिक्षाचालकाशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि सिया घर सोडून भोपाळला आली. तिथे दोघांनी लग्नही केले.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

समीरचं हे तिसरे लग्न होते. त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती, तर दुसरी पत्नी त्याच्यासोबतच राहत होती. सियाला घरी आणल्यानंतर समीरने सुरुवातीला ती आपली मेहुणी असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले. मात्र, नंतर त्यांच्या लग्नाचं सत्य समोर आले. एकाच घरात दोन पत्नींना ठेवण्यावरून समीरच्या घरात सतत वाद होऊ लागला. याच वादामुळे त्याची दुसरी पत्नी काही दिवसांपूर्वीच माहेरी निघून गेली होती.

दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजी परिसरातील एका पाण्याच्या टाकीत एक संशयास्पद लोखंडी पेटी आढळली. पोलिसांनी ती पेटी उघडली असता त्यात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेहाच्या हातावर ‘दीप’ नावाचा टॅटू आणि जन्म तारीख कोरलेली होती. या खुणांच्या आधारे पोलिसांनी मृतदेहाची ओळख ‘सिया’ म्हणून पटवली. यानंतर हे हत्याकांड उघडकीस आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर आणि सिया यांच्यात तीन दिवसांपूर्वी जोरदार भांडण झाले होते. रागाच्या भरात समीरनं सियाचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने त्याच्या दुसऱ्या लग्नात हुंड्यात मिळालेली पत्र्याची पेटी काढली. त्या पेटीत सियाचा मृतदेह कोंबला आणि ती पेटी घराशेजारील पाण्याच्या टाकीत फेकून दिली. धक्कादायक म्हणजे, खून केल्यानंतर समीर अत्यंत निर्धास्तपणे आपल्या दुसऱ्या पत्नीला आणण्यासाठी जबलपूरला गेला होता. मृतदेह तीन-चार दिवस जुना असल्याने तो कुजण्यास सुरुवात झाली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून संशयित पती समीरला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली जात असून या घटनेने गोंदिया आणि भोपाळ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पुणे! आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने पत्नीच्या वाढदिवशी घेतला जगाचा निरोप…

पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…

सासूचे अनैतिक संबंध अन् सुनेने संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण…

माझ्याशी बोल, तुझ्यावर प्रेम आहे. जर तू बोलली नाहीस, तर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!