
बुलेटवरून युवतीला कट मारण्याचा स्टंट पडला महागात; दोघांचा जागीच मृत्यू…
नागपूर : नागपूरमध्ये स्टंटबाजी करताना आणि युवतीला कट मारुन भरधाव वेगाने पुढे जाण्याच्या नादात बुलेटवरील दोन युवकांचा भीषण अपघात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नागपूर शहरातील काचिपुरा परिसरात रात्री उशिरा ही घटना घडली. वर्धा मार्गावरील जनता चौक ते बजाजनगर चौकदरम्यान बुलेटवरून वेगात फेऱ्या मारत सिग्नल जंप करत असताना हा अपघात घडला. शहरातील विष्णूजी की रसोई समोर एका महिला दुचाकीस्वाराला कट मारताना चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकी थेट रस्त्याकडील पिलरवर आदळली.

दुचाकी अपघातात युग विशाल चनकापूरे (वय १९) आणि रुद्र शशिकांत सोमकुंवर (वय १९) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास बजाज नगर पोलिस ठाणे करत आहेत.
Valentine Day ला शिक्षकाने विद्यार्थिनीला बाहेर बोलवलं अन्…
सातारा! प्रेयसीने प्रेम संबधातून केला प्रियकराचा खून; कुऱ्हाडीने वार…
पुणे! युवकाने प्रेमसंबंधातून संपवलं आयुष्य, दोन बहिणींवर गुन्हा…
इन्स्टाग्रामवरील प्रेम! महाराष्ट्राची लेकीच्या लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट…

