
भिगवणमधील युवतीच्या अपहरण प्रकरणात आला नवा ट्विस्ट…
पुणे: दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे एका युवतीचे (वय २१) भररस्त्यात अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, युवतीच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
लग्नाची खरेदी करून जात असताना पीडित युवती आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात होती. यावेळी त्यांची दुचाकी अडवली. काही कळण्याच्या आतच आरोपींनी आई आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट फेकले. डोळ्यांची प्रचंड आग होऊ लागल्याने त्यांना काहीही दिसणं अशक्य झालं. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी युवतीला जबरदस्तीने सोबत घेतले आणि तिथून पळ काढला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस ठाण्याबाहेर रात्री मोठ्या संख्येने जमाव जमला होता. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी भिगवण बंदची हाक देण्यात आली आहे. रात्री पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या दिल्यानंतर पुणे सोलापूर महामार्ग रोखून धरण्यात आला. अपहरण झालेल्या मुलीचे आणि मुलांचे घर शेजारी-शेजारी आहे. दोघांच्यात एक महिनाभरापासून फोनवर बोलणे होतं होते. पोलिसांनी मुलीला शोधण्यासाठी सहा पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी 165 किलोमीटरचा रूट मॅप केला आहे. यामध्ये कोणताही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी, कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. जर कुणी अशा पद्धतीचे वर्तन केलं तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल अशी सूचना देखील पोलिसांनी दिली आहे.
अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी माहिती देताना सांगितले की, अपहरण आणि जबरी चोरी अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत. जहीर शेख आणि अयान शेख या दोन सख्ख्या भावांचा या घटनेमध्ये समावेश आहे. यामध्ये जे पीडित आहे ते आणि आरोपी या दोघांनी एकमेकांना फोन आणि टेक्स्ट मेसेज केल्याचेही समोर आले आहे. हे सर्व तपासामध्ये आढळले आहे, त्या अनुषंगाने काल घटनेनंतर आम्ही चार टीम रवाना केल्या होत्या, सर्वांचे फोन अद्यापही बंद आहेत आणि आमच्या टीम ज्या रवाना झाले आहेत, त्या सीसीटीव्हीच्या अनुषंगाने तपास करत आहेत. मी सर्व संघटनांना आवाहन करतो की, कोणत्याही पद्धतीच्या अफवांना बळी पडू नये, बेकायदेशीर किंवा चुकीच्या गोष्टी कोणीही करू नये. पोलिस तपास करत आहेत. यामध्ये जे काही सत्य आहे ते उजेडात येईल. त्यामुळे सर्वांनी शांतता राखावी.
दरम्यान, 12 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यानचे आम्ही त्यांचे कॉल डिटेल्स मागवले आहेत. त्या दरम्यान त्यांचे कॉल झालेले दिसत आहेत. टेक्स्ट मेसेज झालेले दिसत आहेत. हे फक्त रेगुलर सिम कार्ड वरून झालेला आहे. व्हाट्सअप चा डाटा अद्याप मिळालेला नाही, त्याची माहिती मागवलेली आहे, त्यामधून काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. लहानपणापासून त्यांचे एकमेकांशी ओळख आहे. पोलिस सध्या सीसीटीव्ही तपासून त्या दृष्टीने तपास करत आहोत. त्या रूटने गेलेले आहेत. त्या रूट चा तपास करत आहोत, आमच्या टीम वेगवेगळ्या मार्गाने त्यांचा तपास करत आहेत. लवकरच आम्ही त्यांना ताब्यात घेऊ असेही पोलिसांनी सांगितले आहे.
पुणे! इन्स्टाग्रामवरील मुलीच्या माध्यमातून मुलाचे अपहरण अन् निर्घृणपणे हत्या…
पुणे! युवकाचे अपहरण करून विवस्त्र करत बेदम मारहाण अन् काढला व्हिडिओ…
Video: पुणे शहरातून भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; टोळीचा पर्दाफाश…
पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…

