
पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आंध्र प्रदेशातून निलंबित पोलिसाला केली अटक…
पुणे: खाकी वर्दीचा धाक दाखवून आणि घरगुती अडचणींचे खोटे कारण सांगून अनेक महिला आणि व्यावसायिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणारा निलंबित पोलीस हवालदार गणेश अशोक जगताप (वय ५२) पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून फिल्मी स्टाईलने अटक केली आहे.
गणेश जगताप याच्यावर पुणे शहरात फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका महिलेकडून १७ लाख रुपये रोख आणि तब्बल ७३ तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केली. पार्लर व्यावसायिक महिलेला मुलीच्या शिक्षणाचे आणि आजारपणाचे कारण सांगून अडीच लाख रुपये आणि ६ तोळे सोन्याचे दागिने लांबवले. एका सराफ व्यावसायिकाला निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे नाव सांगून ८ लाख २२ हजार रुपयांचे दागिने खरेदी करून गंडा घातला आहे. याप्रकरणी पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

ऑगस्ट २०२४ मध्ये विशेष शाखेत बदली होऊनही हजर न होता जगताप फरार झाला होता. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले. तांत्रिक तपासावरून तो आंध्रप्रदेशातील फुलपथरू गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक स्नेहल थोरात यांच्या पथकाने थेट आंध्रप्रदेशातून ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
पुणे! पोलिसांना फोन का केला? अन् धारदार शस्त्राने सपासप वार…
पुणे! माझ्या पत्नी आणि मुलीसोबत आयुष्य जगायचं होतं; मन हेलावणारी व्यथा…
पुणे! प्रियकराला संपवलं पण सिग्रेट अन् दारुच्या बाटलीने अडकवलं…
पुणे! नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडणारी घटना कॅमेऱ्यात कैद…

