सरपंचांची ग्रामसेविकेला अजब मागणी; येऊ का टेन्शन दूर करायला…

अहिल्यानगर: कोपरगाव तालुक्यातील एका गावातील माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे याने एका ग्रामपंचायतीत शासकीय सेवेत असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात 14 फेब्रुवारी रोजी दाखल केली आहे.

फिर्यादीत पीडित महिलेने म्हटले आहे की, ‘माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे दीड ते दोन वर्षांपासून मला वारंवार फोन करून तुम्ही आज छान साडी घातली. खूप छान दिसता. कधीकधी तुम्ही खूप सुकलेल्या दिसतात. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. माझ्या बायको मुलापेक्षा तुम्ही मला जास्त आवडता. आज खूप टेन्शन आहे का? मी येऊ का टेन्शन दूर करायला म्हणून माझ्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत असून सदर इसमा विरुद्ध माझी तक्रार आहे, असे म्हणत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

crime-book

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपीला अटक झाली नसल्याने कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने मंगळवारी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांना निवेदन देऊन सदर आरोपीला दोन दिवसात अटक करा अशी मागणी केली आहे. आरोपीला दोन दिवसात अटक झाली नाही तर आम्ही सर्व काम बंद आंदोलन करू असा इशारा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

बीडच्या माजी सरपंचाचा तामिळनाडूमध्ये प्रताप; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

उपसरपंच गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड प्रकरणात नवा ट्विस्ट…

Video: सरपंचाला मैत्रिणीसोबत रंगेहात पकडलं, बायकोनं धू-धू धुतलं…

प्रियकराला तीन बायका तर प्रेयसीला दोन नवरे; अन् पुन्हा प्रेमसंबंध…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!