पुणे शहरात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत बदल, पाहा पर्यायी मार्ग…

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. १९) पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मिरवणुका आणि कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता तसेच परिसरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक वाढून कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी सात पासून सायंकाळी गर्दी संपेपर्यंत मध्यवर्ती भागात वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

हिंजवडी मधील वाहतुकीत बदल…
शिवजयंती निमित्त हिंजवडी मधील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. गुरुवारी (ता. १९ फेब्रुवारी) दुपारी तीन ते रात्री अकरा या कालावधीत हा बदल असेल. याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त वाहतूक विवेक पाटील यांनी दिले आहेत. हिंजवडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर हिंजवडी गावठाण ते शिवाजी महाराज चौक हिंजवडी या मार्गावर मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी होणार असून संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. कस्तुरी चौक ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. या मार्गावरून मारुंजी वाय जंक्शन येथून येणारी वाहने कस्तुरी चौक, विनोदे वस्ती, इंडियन ऑइल चौक मार्गे जातील.

मेझा नऊ चौकाकडून हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतूक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सरळ पुढे जाऊन इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती मार्गे जाईल. शिवाजी चौकाकडून यु टर्न घेऊन जांभुळकर जिम चौक मार्गे हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतूक जांभुळकर जिम चौकातून सरळ पुढे इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती चौक मार्गे जाईल. मेझा नऊ चौकाकडून श्री शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या दोन लेन पैकी डावी लेन बंद करून सर्व वाहतूक उजव्या बाजूच्या लेनने सुरू राहील.

उपायुक्त वाहतूक विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३ ते रात्री ११ या वेळेत विशेष वाहतूक नियोजन लागू करण्यात येणार आहे. या कालावधीत कस्तुरी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यानचा रस्ता सर्व वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

पर्यायी मार्ग
पोलिस प्रशासनाने पुढील पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत :
मारुंजी वाय जंक्शनकडून येणारी वाहने : कस्तुरी चौक – विनोद वस्ती – इंडियन ऑईल चौक मार्गे वळविण्यात येतील.
मेझा नाईन चौकातून हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहने : छत्रपती शिवाजी महाराज चौक – इंडियन ऑईल चौक – कस्तुरी चौक – विनोद वस्ती मार्गे वळविण्यात येतील.
शिवाजी चौक येथे यू-टर्न घेऊन जांभुळकर जिम चौक व हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहने : जांभुळकर जिम चौकातून सरळ इंडियन ऑईल चौक – कस्तुरी चौक – विनोद वस्ती चौक मार्गे जावे लागेल.
तसेच मेझा नाईन चौक ते शिवाजी महाराज चौक या दोन लेनपैकी डावीकडील लेन बंद ठेवण्यात येणार असून सर्व वाहतूक उजव्या लेनमधूनच सुरू राहील.
वाहनचालकांनी सुधारित मार्गांचा अवलंब करावा आणि मिरवणूक मार्गावर तैनात वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहरात रात्री 12 ते पहाटे 3 दरम्यान काय घडलं; पोलिसांचा प्रचंड फौजफाटा…

Cyber Crime! पुणे शहरातील सर्वात मोठा सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस…

पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…

पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आंध्र प्रदेशातून निलंबित पोलिसाला केली अटक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!