माजी IPS अधिकारी मृत्यू प्रकरणी मुंबईतून चौघांना अटक…

मुंबईः माजी IPS अधिकारी अमर सिंग चहल यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या परवानाधारक बंदुकीतून छातीत गोळी घालून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपली सायबर चोरांकडून ८ कोटी १५ लाखांची फसवणूक झाल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले होते. या प्रकरणाचा तपासाचा भाग म्हणून पंजाब पोलिसांचे पथक मुंबईतील नवघर पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे. या खळबळजनक प्रकरणाचे धागेदोरे भाईंदर पूर्व परिसरातील काही व्यक्तींशी जोडले गेल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

माजी IPS अधिकारी अमर सिंग यांनी सुमारे ८ कोटी रुपयांच्या ऑनलाइन फसवणुकीमुळे मानसिक तणावातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पंजाब पोलिसांनी नवघर पोलिस ठाणे हद्दीतून चार जणांना ताब्यात घेतले आहे. आरोपींची कसून चौकशी सुरू असून ऑनलाइन फसवणूक रॅकेटच्या इतर साखळ्यांचाही सखोल तपास केला जात आहे. या फसवणूक प्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहे, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहेत.

पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील रहिवासी असलेले अमर सिंग चहल हे १९९० च्या बॅचचे IPS अधिकारी होते. त्यांनी पंजाब पोलिसात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आणि २०१९ मध्ये ते महानिरीक्षक (आयजी) म्हणून निवृत्त झाले. एकेकाळी प्रसिद्ध पोलिस अधिकारी असलेल्या चहल यांनी त्यांच्या १२ पानांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांचे सगळं दु:ख सांगितले आहे.

त्यांनी लिहिले की, ८.१० कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीने ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. वेल्थ इक्विटी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या सायबर फसवणूक करणाऱ्यांनी माझी ८.१० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक करणाऱ्यांनी “F-७७७ DBS वेल्थ इक्विटी रिसर्च ग्रुप” या नावाने व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम ग्रुप बनवला होता. त्यांनी DBS बँकेचे सीईओ असल्याचा आणि मोठ्या बँकांशी संबंधित असल्याचा दावा केला आणि विश्वास संपादन केला. त्यांनी मला स्टॉक ट्रेडिंग, IPO, OTC ट्रेड्स आणि क्वांटिटेटिव्ह फंडमध्ये जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी बनावट डॅशबोर्ड तयार केला आणि खोटा नफा दाखवला. ज्यामुळे माझा विश्वास वाढला आणि मला अधिक पैसे गुंतवण्यास भाग पाडले.

मी तीन बँक खात्यांमधून ८.१० कोटी रुपये हस्तांतरित केले गेले. यासाठी ७ कोटी रुपये कर्ज घेतले गेले. गुंतवणुकीनंतर मी ५ कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खंडणी सुरू झाली. २.२५ कोटी रुपये (१.५% सेवा शुल्क + ३% कर) वसूल केले. तरीही माझे पैसे परत केले नाहीत. नंतर प्रीमियम सदस्यता शुल्क म्हणून २ कोटी रुपये मागितले गेले, त्यानंतर पुन्हा २ कोटी रुपये मागितले. हा घोटाळा ऑक्टोबरमध्ये झाला. ही एक अतिशय संघटित टोळी आहे. फक्त एसआयटी किंवा सीबीआय सारखी एजन्सीच याला पकडू शकते. त्यांनी फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा आणि पैसे वसूल करण्याची विनंती केली. माझ्या आत्महत्येसाठी फसवणूक करणाऱ्यांशिवाय कोणीही जबाबदार नाही. त्यांनी त्यांच्या कुटुंबाची आणि मित्रांची माफी मागितली. आता या प्रकरणात मुंबई कनेक्शन समोर आले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

IAS पत्नी जपान दौऱ्यावर असताना IPS अधिकाऱ्याची आत्महत्या…

अजित पवार यांना नडणाऱ्या IPS अंजली कृष्णा आहेत कोण…

IPS विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरून 78 लाख रुपयांना लुटलं…

Digital Arrest! IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; कोटींचा गंडा…

अभिमानास्पद! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!