Video: विद्यार्थ्याने लाइव्ह क्लासमध्ये शिक्षकाला मारले चपलेने; पण का?

नवी दिल्ली : फिजिक्सवाला क्लासच्या लाइव्ह क्लासमध्ये एका विद्यार्थ्याने शिक्षकाला चपलेने मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे.

फिजिक्सच्या शिक्षकाला शिक्षकाला मारहाण करणारा त्यांच्याच वर्गातील विद्यार्थी आहे. शिक्षक ऑनलाईन क्लास घेत होते. त्याचवेळी त्याच्यासमोर काही विद्यार्थी होते. त्यापैकीच एक विद्यार्थी उठला आणि त्याने शिक्षकाला मारले. लाइव्ह क्लास असल्याने अनेकांनी हे दृश्य पाहिले. शिवाय, संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ कलेश नावाच्या पेजने शेअर केला आहे. अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवताना प्रकरण काय? अशी विचारणा केली आहे. पण, कारण अद्याप पुढे आलेले नाही.

दरम्यान, फिजिक्सवालाचे प्रसिद्ध शिक्षक तरुण कुमार, मनीष दुबे आणि सर्वेश दीक्षित यांनी कंपनीचे संस्थापक अलख पांडे यांच्याशी मतभेद असल्याचा दावा करत यापूर्वीही व्यासपीठ सोडले होते. त्यांच्या व्हिडिओमध्ये कुमार, दुबे आणि दीक्षित यांनी दावा केला आहे की फिजिक्सवालाचे शिक्षक पंकज सिजारिया यांनी त्यांच्यावर लाच घेतल्याचे बिनबुडाचे आरोप केले. फिजिक्सवालाचे वातावरण आता विद्यार्थ्यांसाठी पोषक राहिलेले नाही, असा दावा त्यांनी केला.

Video: स्लो मोशनच्या नादात Live मृत्यू झाला कॅमेऱ्यात कैद…

Video: युवतीला चुकीचे इंजेक्शन अन् आई-वडिलांसमोरच सोडला जीव…

Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…

Live Video: बसमध्ये चढताना पाकीट कसे मारले जाते पाहा…

Video: पोलिसाने पळत जाऊन घातली चोरट्यांच्या दुचाकीला लाथ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!