
नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे असणाऱ्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची एसआयटी पथकाने तपासणी केली. या कार्यालयाच्या झाडाझडतीदरम्यान कार्यालयातील एक गोष्ट पोलिसांच्या नजरेत भरली. अशोक खरातच्या केबिनमधील अत्युच्च दर्जाच्या काचा पाहून पोलिस थक्क झाले.
अशोक खरात याने बाहेरुन केबिनच्या आतले दृश्य दिसू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली होती. त्यामुळेच तो केबिनच्या बाहेर लोकांची गर्दी असतानाही आतमध्ये महिलांवर बिनधास्तपणे लैंगिक अत्याचार करायचा. अशोक खरात याच्या केबिनसह कार्यालयाची प्रत्येक काच अतिगडद काळ्या रंगाची आहे. या काचा अत्यंत उच्च दर्जाच्या आहेत. कितीही प्रयत्न केला तरी या काचेतून बाहेरुन आतले दृश्य दिसत नाही. याबाबत आज सरकारी वकिलांकडून न्यायालयात माहिती सादर केली जाण्याची शक्यता आहे.

अशोक खरात याच्याविरोधात आणखी काही महिलांनी लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे एसआयटीकडून (SIT) अशोक खरात याची पोलिस कोठडी वाढवून मागितली जाऊ शकते. आतापर्यंतच्या एसआयटीच्या तपासात अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती आहे. पोलिसांनी अशोक खरातने नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला होता. अशोक खरात याच्या पोलिस कोठडीची मुदत रविवारी संपुष्टात येत असून आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. शनिवारी विशेष तपास पथकाने (एसआयटी) अशोक खरात याची तब्बल 10 तास कसून चौकशी केली. त्याच्याविरोधात आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल झाले असून यापैकी 8 गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे तर दोन गुन्हे हे फसवणुकीचे आहेत.
अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…
भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…
भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…
भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…
महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…
सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…
नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…
नाशिक! अशोक खरात याचं आणखी एक कांड; युवतीने सगळंच सांगितलं…
अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…
नाशिकच्या अशोक खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं? पाहा…
अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…
नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…
फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

