विकृती! भाडेकरूला मांजरावर बलात्कार करताना पकडले रंगेहाथ…

डेहराडून (उत्तराखंड): एका भाडेकरूने घरमालकिणीच्या पाळीव मांजरावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मांजरावर बलात्कार करताना मालकिणीने भाडेकरूला रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

मांजराच्या मालकिणीने या प्रकरणी तिच्या भाडेकरूविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या घरात एकूण चार भाडेकरू राहतात. घटना घडली तेव्हा तीन जण कामावर गेले होते. पवन (रा. बिहार) नावाचा युवक घरीच होता. आरोपी मांजराला खायला देण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. मांजराला आणण्यासाठी त्याच्याकडे गेली, तेव्हा पवन बलात्कार करताना रंगेहाथ सापडला. मांजराच्या प्रायव्हेट पार्टला सूज आली असून रक्तस्राव होत आहे.’

महिलेने भाडेकरूविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करून त्याच्यावर कडक कारवाईची मागणी केली. पोलिसांनी पवनकुमारविरोधात प्राणीक्रूरता कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिस या प्रकरणी डॉक्टरांशीदेखील सल्लामसलत करत आहेत. उपचारांसाठी मांजराला पशुवैद्यकीय दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

विकृती! मादी श्वानाशी अनैसर्गिक सेक्स करताना एकाने पाहिले अन्…

कुत्रा सतत भुंकत असल्याने त्याच्या गुप्तांगात रॉड घुसवला अन् पुढे…

क्रूरता! घोडींचे गुप्तांग शिवले तांब्याच्या तारेने…

क्रूरता! कुत्र्याला बेदम मारहाण करत दिली फाशी…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!