दिवाळीत महिलांची सोनसाखळी चोरणाऱ्यास चिखली पोलिसांनी केली अटक…
पुणे (सुनिल सांबारे): दिवाळीत महिलांच्या सोनसाखळी चोरणा-या गुन्हेगारास चिखली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत.
सध्या दिवाळी सणाची धामधुम असल्याने मोठया प्रमाणात महिला व नागरिक हे बाजारामध्ये कपडे, दागिने, इत्यादींची खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असतात. याचा फायदा घेवून सोनसाखळी चोर हे बाजारामध्ये दागिने घालून आलेल्या महिलांवर पाळत ठेवून त्या रोडने चालत जात असताना अचानकपणे येवून महिलांचे अंगावर असलेले दागिने जबरदस्तीने ओढुन खेचुन जबरी चोरी करतात. त्याला प्रतिबंध करण्याचे दृष्टीने संदीप डोईफोडे, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ ३ यांचे मागदर्शक सुचनेवरुन चिखली पोलिस स्टेशनकडील तपास पथकांमार्फत बाजारामध्ये गर्दीचे ठिकाणी पेट्रोलिंग नेमण्यात आली आहे. सोनसाखळी चोरांना पकडण्याकरीता वेळोवेळी ट्रॅप लावण्यात आले होते.
रुचिता गौरव महाजन (वय २४ वर्षे, धंदा.- गृहीणी, रा. मुळगांव मु. पो. सिंधखेडा ता.रावेर जि. जळगाव सध्या रा. सी/ओ सुजाता कंराडे) या दिवाळीचे सणाकरीता माहेरी जाधववाडी चिखली पुणे येथे आल्या होत्या. ०७/११/२०२३ रोजी १९.४५ वाजताचे सुमारास राहते घरातुन पायी चालत जात असताना राजे शिवाजीनगर, गार्डनसमोर, रस्त्यावर, जाधववाडी, चिखली, पुणे येथे आल्यावेळी एकाने अचानकपणे समोर येवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसका मारुन ओढून ते जबरी चोरी करुन घेवुन पळून गेला. त्याच्या तक्रारीवरून चिखली पोलिस स्टेशन गु. रजि. नंबर ७३२/२०२३, भादवी कलम ३९२ प्रमाणे गुन्हा नोंद असुन सदर गुन्हयाचा तपास सहा पोलिस निरीक्षक तौफिक सय्यद हे करत होते. अश्याच प्रकारची घटना २६.१००२३ रोजी रामायण मैदान, जाधववाडी या ठिकाणिही झालेली होती. त्याबाबत चिखली पोलिस स्टेशन गु.र.क्र. ७०३ / २०२३ कलम ३९२ भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता.
दोन्ही घटनामधील आरोपी हा एकच असल्याचे फिर्यादी सांगत होते. परंतु, कोणताही पुरावा नसल्याने अश्या सोनसाखळी चोराला पकडणे हे पोलिसांसमोर एक आव्हान होते. चिखली पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनानुसार तपास अधिकारी सपोनि तौफिक सय्यद यांनी त्याचे पथकातील कर्मचा-याच्या मदतीने दोन्ही घटनास्थळाचे परीसरातील सिसिटिव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यांना सदरचा गुन्हा हा अंगाने मध्यम, हिरव्या रंगाचा टी शर्ट, दाढी वाढलेली, काळे रंगाची पॅन्ट करुन अंदाजे वय २२ ते २५ वर्षे या वर्णनाच्या इसमाने केला असल्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे जाधववाडी परिसरातील बाजारामध्ये गुन्हे प्रगटीकरण शखाचे सपोनि सय्यद व टीम भोर यांनी पेट्रालिंग दरम्यान वरील वर्णनाचा इसम हा पुन्हा गुन्हा करण्याच्या तयारीत असताना त्याच्या हालचालीवरुन आरोपीस ओळखुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. रोहित दशरथ गावडे (वय २३ वर्षे, सध्या राह. दत्तनगर, राहुल जाधव यांचे
ऑफीसचे मागे, श्री.बबन दरगुडे यांची रुम, दुसरा मजला, जाधववाडी, चिखली पुणे, मुळ राह. मु. पो. जंक्शन लासुर्णे, ता. इंदापुर, जि. पुणे) असे त्याने नाव सांगितले.
पोलिसांचा खाक्या दाखवताच त्याने दोन्ही गुन्हयाची कबुली दिली असून त्याच्याकडून दोन्ही गुन्हयातील चोरीस गेलेली सोन्याची दोन्ही मंगळसुत्र हस्तगत करण्यात आलेले आहेत. अश्या प्रकाराने चिखली पोलिस स्टेशनकडील सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कामगिरी संदीप डोईफोडे, पोलिस उपआयुक्त परिमंडळ – ३, पिंपरी चिंचवड, विवेक मुंगळीकर, सहा. पोलिस आयुक्त, भोसरी विभाग, ज्ञानेश्वर काटकर, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण शाखेचे सपोनि तौफिक सय्यद, पोहवा/बाबा गर्जे, पोहवा / सुनिल शिंदे, पोहवा / चेतन सावंत, पोहवा / भास्कर तारळकर, पोहवा / दिपक मोहिते, पोहवा/संदीप मासाळ, पोहवा / अमोल साकोरे, पोहवा / विश्वास नाणेकर, पोना / कबीर पिंजारी, पोना/राठोड, पोशि/संतोष सपकाळ, पोशि/ गौतम सातपुते, पोशि / नाईक यांनी यशस्वी रित्या पार पाडली.