
वाशिम जिल्ह्यात तीन वाहनांमध्ये भीषण अपघात; तिघांचा मृत्यू तर…
वाशिम : वाशिम जिल्ह्यात रिक्षा आणि पिकअप यांच्यात झालेल्या अपघात तिघांचा मृत्यू तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कारंजा ते पोहा मार्गावरील तुळजापूर धरणाजवळ रिक्षा आणि पिकअप गाडी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर कारंजा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की, अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
कारंजा-पोहा मार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप वाहनाने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रिक्षाला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की रिक्षात बसलेले सर्व प्रवासी गंभीर जखमी आहेत. याच रिक्षाच्या मागून दुसरा मालवाहक ऑटो देखील येत होता. या वाहनाची देखील पिकअपला धडक बसली. तीन वाहनांच्या झालेल्या या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी जखमी प्रवाशांना तातडीने कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलिस करत आहेत.
भीषण अपघात! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तीन युवकांना एसटी बसने चिरडले…
पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू…
महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या IT मधील युवतीचा अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! नाशिकमध्ये अपघातात ८ जणांचा मृत्यू; पाहा नावे; स्टेटस टाकलं अन्…
बीड जिल्ह्यातील आणखी एका सरपंचाचा गेला जीव; अपघात की घातपात?…