अहमदनगर जिल्ह्यामध्ये मंदिरातील फोडल्या चार दानपेट्या…
अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरातील चार दान पेट्या फोडून त्यातील रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरातील चोरीचा हा प्रकार दुसर्या दिवशी मंदिराचे पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे मंगळवारी रात्री नऊची आरती आटोपल्यानंतर देवस्थान समितीने मंदिर बंद केले होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या पाठीमागून चार-पाच चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला आणि मंदिरातील चार दान पेट्या उचलून पाठीमागील बाजूस नेल्या. पण, मंदिराच्या मुख्य गाभार्यात ज्या ठिकाणी आदिनाथांचे स्वयंभू शिवलिंग आहे त्या ठिकाणची दानपेटी मात्र चोरट्यांना उचलता आली नाही. मंदिराच्या पाठीमागे वाहणाऱ्या नदीजवळ चार दान पेट्या नेऊन त्या कटरने फोडल्या. त्यातील लाखो रुपयांच्या नोटा चोरट्यांनी लंपास केल्या. दानपेटीतील चिल्लर तशीच ठेवण्यात आली. दानपेटीतील भाविक भक्तांनी दान केलेल्या काही सोन्याचांदीच्या वस्तू देखील चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.
मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडल्याची माहिती समजल्यानंतर पाथर्डी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पथकातील रक्षा या श्वानाने मंदिरातील पाठीमागील नदीजवळ टाकलेल्या दानपेट्यापासून तपासाला सुरुवात केली. वृद्धेश्वर मंदिराजवळ असलेल्या राम मंदिरापासून पुढे सावरगाव घाट या डांबरी रस्त्यापर्यंत श्वानाने चोरटे गेल्याची दिशा दाखवली. त्यापुढे मात्र चोरटे वाहनाच्या मदतीने फरार झाले असावेत असा पोलिसांचा संशय आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अहमदनगर हादरले! नवरा-बायकोच्या भांडणानंतर बापाने फेकले चिमुकल्यांना विहीरीत…
… तर मी कार्यक्रम करणं खरंच बंद करेन : गौतमी पाटील
धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…
सातारा जिल्ह्यात भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात; चौघांचा मृ्त्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…