Cyber Crime! पुणे शहरातील सर्वात मोठा सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस…

पुणे : पुणे शहरातील शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 22 कोटी रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून जवळपास आठ जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

शेअर मार्केटच्या नावाने पैशांचे आमिष दाखवून अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या घटना घडत आहेत. शिवाय, दिवसेंदिवस सायबर (Cyber crime) गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरातून आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 22 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याने शेअर बाजार गुंतवणुकांमध्ये खळबळ उडाली आहे. शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत, आकर्षक आणि हमखास परताव्याचे आश्वासन संबंधितांकडून देण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून संबंधित ज्येष्ठ नागरिकांनी तब्बल 22 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

शेअर बाजारातील गुंतवणुकीतून नफा मिळवून देण्याच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदाराने तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणात पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून जवळपास आठ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या खात्यांवर वेळोवेळी अशाच प्रकारे इतर लोकांचे पैसे फिरवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या सायबर चोरट्यांनी आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याचा सखोल तपास सध्या पुणे पोलिस करत आहेत. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा शेअर मार्केटमधील मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून केली जाणारी फसवणूक चर्चेत आली आहे. नागरिकांनी शेअर मार्केटच्या नावाने आमिष दाखवणाऱ्यांच्या भूल थापांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Cyber Crime! पुणे शहरातील नागिरकांना आमिष दाखवत 97 लाखांची फसवणूक…

Cyber Crime! पुणे सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीचे नेटवर्क केले उद्ध्वस्त…

Cyber Crime! पुणे शहरात सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस…

Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!