सातारा जिल्ह्यात भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात; चौघांचा मृ्त्यू…
सातारा : सातारा जिल्ह्यात भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात झाला असून, या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. जखमी असलेल्यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाविक ओमनी मोटारीने देवदर्शनासाठी निघाले होते. साताऱ्यातील सुर्याचीवाडी येथे भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात झाला. मोटार झाडावर आदळून झालेला हा अपघात इतका भीषण होता की यात तिघे जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारावेळी मृत्यू झाला. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
अपघातात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी सर्वजण कुरोली आणि बनपुरी येथील रहिवासी आहेत. ते बाळू मामांच्या मेंढरांचे देवस्थान असलेल्या लाकरेवाडी येथे दर्शनासाठी निघाले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सातारा जिल्ह्यात लेकीचाही अपघाती मृत्यू; उदयनराजे यांची भावनिक पोस्ट…
ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे तिघांना गमवाला लागला जीव…
समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…
पोलिसांच्या गाडीला पाठीमागून जोरात धडक; दोन ठार…
पुण्यातून कोकणात फिरायला जाताना कार धरणात बुडाली; युवतीसह तिघांचा मृत्यू
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…