खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा तासाभरातच मृत्यू…
कल्याण: मूल होत नसल्यामुळे हिस्ट्रोलेप्रोस्कोपीसाठी खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा लेप्रोस्कोपी सुरु असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजा लोखंडे असे मृत महिलेचे नाव आहे. कल्याण अॅपेक्स रुग्णालयात हा प्रकार घडला आहे.
रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयातील डॉक्टर मानसी घोसाळकर यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत. महिलेला वाचवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. शवविच्छेदन अहवालामध्ये महिलेच्या मृत्यूचे कारण समजेल असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
पूजा लोखंडे (रा. विक्रोळी) यांना मूल होत नसल्याने उपचारासाठी त्या कल्याण येथे आपल्या आई-वडिलांकडे आल्या होत्या. त्यांच्यावर कल्याण अॅपेक्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी (ता. 11) सकाळी पूजा लोखंडे या आपल्या आईसोबत रुग्णालयात आल्या. सकाळी त्यांची हिस्ट्रोलेप्रोस्कोपी होणार होती. त्यासाठी सकाळीच पूजा रुग्णालयात दाखल झाल्या. परंतु, हिस्ट्रोलेप्रोस्कोपी सुरु असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि तासाभरात त्यांचा मृत्यू झाला.
पूजा यांचा मृत्यू झाल्याचे कळताच तिच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. नातेवाईकांच्या गोंधळानंतर बाजारपेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
आमदारपुत्राची दादागिरी; बंदुकीच्या धाकाने व्यावसायिकाचे अपहरण…
नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे वाढले गूढ; संशय बळावला…
अमिताभ गुप्ता यांची संकल्पना! येरवड्यातील कैदी उपहागृहात बनवणार विविध पदार्थ…
मुलीला साप चालवल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…