नितीन देसाई यांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…

मुंबई: प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर एडलवाईज कंपनीवर याप्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ‘माझ्या वडिलांनी कोणालाच फसवलेले नाही’, अशी प्रतिक्रिया नितीन देसाई यांची कन्या मानसी देसाई हिने दिली आहे.

मानसी देसाई म्हणाली, ‘माझ्या वडिलांनी कोणालाही फसवलेले नाही. त्यांचा तसा प्रयत्नही नव्हता. कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला. त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे पैसे थकले. तसेच एडलवाईज कंपनीने वडिलांना खोटी आशा दाखवली, माझ्या वडिलांनी खूप मेहनत करुन त्यांचे नाव कमावले आहे ते मातीत मिळवू नका.’

दरम्यान, नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी एडलवाईज कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच कर्जासंदर्भात कागदपत्र घेऊन हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एडलवाईज फायनान्स या कंपनीनं आपली बाजू स्टॉक एक्सचेंजच्या फायलिंगमध्ये स्पष्ट केली आहे. एडलवाईजचे अधिकारी चौकशी प्रक्रियेला संपूर्ण सहकार्य करणार आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी असे आपलेही मत आहे, असे एडलवाईज कंपनीने म्हटले आहे. आमच्या सर्व कृती या कायदेशीर होत्या हे चौकशीतून समोर येईल, असा दावाही कंपनीने केला आहे.

नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नितीन देसाईंच्या पत्नी नेहा देसाई यांच्याकडून ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर खालापूर पोलिस ठाण्यात त्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच जणांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

नितीन देसाई यांच्या पार्थिवाला लेकीनं दिला खांदा; सेलिब्रिटींनी फिरवली पाठ…

मला जगणं असह्य झालंय म्हणून पती रडत होते: नेहा देसाई

नितीन देसाई यांच्या पत्नीने केले गंभीर आरोप; तक्रारीत म्हटले की…

नितीन देसाई यांच्या मृत्यूच्या रात्री नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर…

नितीन देसाई यांच्या आत्महत्येपूर्वी ११ ऑडिओ क्लिप; पहिले वाक्य…

नितीन देसाई यांच्या आत्महत्येची मित्राने सांगितली कहाणी; अहवाल समोर…

मोठी बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!