Video! हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून मारहाण; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

सोलापूर: सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी जवळील 77 77 या हॉटेलच्या मालकाने मॅनेजरला नग्न करून मारहाण केल्याचा Video सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नेटिझन्सनी जोरदार टिका केल्यानंतर स्पष्टीकरणाचा व्हिडिओ समोर आला आहे. अखेर मारहाण करणाऱ्या हॉटेल मालकाला पोलिसांनी अटक करुन त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

टेंभुर्णी येथील हॉटेल 77 77 या हॉटेल मालक लखन माने याने हॉटेलच्या सर्व स्टाफ समोर मारहाण केली आहे. या व्हिडिओ बाबत स्पष्टीकरण देताना हॉटेलचा मालक लखन माने याने त्याच्या मॅनेजरसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये त्यानी म्हटले, दुपारपासून माझा एक व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो वेगळ्या पद्धतीने मांडला गेला आहे आणि कुठेतरी माझं आणि हॉटेलचं त्याचबरोबर मॅनेजरचाही नाव बदनाम करण्यात येत आहे. त्या मागची सत्यता काय आहे, तो व्हिडिओ काय आहे, तो व्हिडिओ कोणी काढला, का काढला, कसा काढला, ते बघूयात. तुम्हाला मॅनेजर सांगतील त्या दिवशी काय घडले होते.

मॅनेजरने सांगितले की, ‘मी गेल्या अनेक दिवसांपासून या हॉटेलमध्ये कामाला आहे. चार-पाच महिन्यापूर्वी मी ड्रिंक केली होती. मला काही सुचत नव्हतं. मला घरचा टेन्शन होतं. त्यामुळे मी ड्रिंक केलं आणि त्यावेळी मी हॉटेलवर आल्यावर मला दादांनी पनिशमेंट दिली होती. पण मी काम इथच करणार आणि शिवाय मला हे माझे फॅमिली मेंबर आहेत. त्यांनी मला लागेल तेव्हा मदत केलेली आहे. हवे तेव्हा पैसे दिलेले आहेत. हा व्हिडिओ ज्या कोणी व्हायरल केला आहे त्यांनी असं करू नये. आज आमच्या हॉटेलचं नाव आणि दादांचं नाव बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, या गोष्टी करू नका असं मी बोलू इच्छितो.’

हॉटेल मालकाने पुढे म्हटले की, ‘हॉटेल 77 77 हे एका कुटुंबाप्रमाणे आहे. इथे काही घटना घडल्या असतील त्या मागची सत्यता काय आहे ती समजून घेतल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ व्हायरल करू नका. महाराष्ट्रात मोठं होणं म्हणजे चुकीचं आहे का? अशी काम करू नका, अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून असं काही पसरवू नका जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोट आहे, मी त्या गोष्टी केल्या नाहीत. मी जे काही केलं ते मॅनेजरने तुम्हाला समोर सांगितलं आहे. जर काही विषय असते तर इतकं मोठं हॉटेल मॅनेजरच्या हातात दिलं नसतं, आमचं नातं भावासारखा आहे, त्यात गालबोट लागणार नाही. जो व्हिडिओ व्हायरल करत आहेत त्यांना माझं नाव बदनाम करायचा आहे, तो हेतू त्यांचा कधीही पूर्ण होणार नाही, सत्य समोर येईल. फक्त जे खरं आहे ते हे आहे.’

पोलिसांनी या प्रकरणी मारहाण झालेला फिर्यादी निवासी नकाते याच्याकडून फिर्याद घेत वस्तुस्थिती समोर आणली. त्यानुसार हॉटेल मालक लखन माने यांनी मॅनेजरला काम सोडून जाऊ नये म्हणून दमबाजी करत लग्न करून मारहाण तर केली. शिवाय, त्याच्या खिशातले पैसे हे काढून घेतल्याचे टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.

संबंधित घटना तीन महिन्यापूर्वीची असल्याचे मारहाण झालेला निवासी नखाते यांनी पोलिसांना सांगितले आहे. लखन माने याच्या दहशतीमुळे अजूनही तो त्याच हॉटेलवर काम करत असून पोलिसांना तसा जबाबही दिल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले. पोलिसांनी तातडीने हॉटेलवरुन आरोपी लखन माने यास ताब्यात घेत तब्बल आठ वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या मध्ये दहशत माजवणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा विविध कलमाखाली गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान लखन माने या आरोपीने कामगारांवर दहशत बसवण्यासाठी केलेल्या या अमानवी मारहाणीच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा दावा पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केला आहे.

पुणे! नवले पूल अपघतात अभिनेत्याचा मृत्यू! चिमुकला झाला पोरका…

सैराट! प्रेमसंबंधातून युवतीच्या प्रियकराला घातल्या गोळ्या…

सोलापूर! युवा वकिलाची आत्महत्या; चिठ्ठीत आईवर खळबळजनक आरोप…

सोलापूर! MBBSचे शिक्षण घेणाऱ्या साक्षीने टोकाचा निर्णय का घेतला…

लातूर-सोलापूर महामार्गावर रक्तरंजित थरार; एकाची हत्या तर मैत्रिणीच्या छातीत खुपसला चाकू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!