छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी; ६४ जणांना अटक…

छत्रपती संभाजीनगर : दोन गटात लाठ्या काठ्यांनी हाणामारी तसेच दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 64 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी घटनास्थळी अश्रू-धुरांच्या नळकांड्यांचा देखील वापर केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पडेगावमध्ये एका घरासमोर 4 मुले बसल्याच्या कारणावरून दोन गटांत वादावादी झाली. या वादावादीचे रुपांतर लाठ्या-काठ्या आणि दगडफेकीमध्ये झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपायुक्त नितीन बगाटे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी आला. दोन्ही गटांतील 64 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरून वाद आहे. विरोधी गटाचे लोक रस्त्याने जाण्यापासून अडवणूक करतात. सोमवारी त्याच रस्त्याने जात असताना काहींनी वाद उकरून काढला. त्यानंतर 40 ते 50 लोकांनी हातातील लाठ्या-काठ्या, दांडे, लोखंडी रॉड, तलवारी आणि दगडाने मारहाण केली. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत, असे शेख आरेफ यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये कंपनीला भीषण आग; सहा कामगारांसह श्वानाचा मृत्यू…

छत्रपती संभाजीनगर हादरलं! अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार…

धक्कादायक! छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच केली आत्महत्या…

संतापजनक! भावकीतील महिलेने सूडाच्या भावनेतून घेतला चिमुकल्यांचा जीव…

प्राध्यापकाच्या बंगल्यात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट; परदेशी युवतीसह…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!