क्रूरता! कुत्र्याला बेदम मारहाण करत दिली फाशी…
जळगाव: एका व्यक्तीने कुत्र्याला बेदम मारहाण करत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दोरीने बांधून फाशी देऊन मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर प्राणी मित्रांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
पारोळा तालुक्यातील बहादरपूर गावातील संशयित आरोपी दिलीप भिमराव पारधी याने गावातील मोकाट फिरणाऱ्या काळ्या रंगाच्या कुत्र्यास बेदम मारहाण केली. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने लटकवून कुत्र्याला फाशी दिली. यानंतर कुत्र्याला ट्रॅक्टरला बांधून ओढत फरफतट नेत नाल्यात फेकून दिल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे.
ट्रॅक्टरखाली हा कुत्रा रोज बसतो आणि त्याने ट्रॅक्टरचं सीट फाडले आहे, या रागातून दिलीप पारधी याने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…
संतापजनक! श्वानाची चाकूने भोसकून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद…
पोलिसांच्या श्वानाने कारजवळ इशारा केला अन् सर्वांनाच बसला धक्का…
क्रूरता! घोडींचे गुप्तांग शिवले तांब्याच्या तारेने…
दारुड्याला कुत्रा भुंकल्याचा आला राग; पत्नीसह दोन मुलांचा चिरला गळा…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…